मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यात भाजपाच्या दिल्लीश्वरांचा हात आहे. भाजपा वैफल्यग्रस्त पक्ष झालेला असून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. आपल्यासोबत येणाऱ्या पक्षांना भाजपा संपवण्याचं काम करतो असं ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
पक्ष वाढत नाही, हे भाजपाचं दुखणं : भाजपाने प्रथम रामदास आठवले यांना बरोबर घेतलं. त्यांच्या पक्षाची पत्ता नाही. सदाभाऊ खोत यांना सोबत घेतलं, भाजपाने त्यांचा पक्ष देखील संपवला. महादेव जानकर यांना सोबत घेतलं त्यांचा पक्ष संपवला. विनायक मेटानं सोबत घेतलं. त्यांचा पक्ष संपवला. भाजपाने शिवसेनेसोबत 20 ते 25 वर्ष राहून विश्वासघात केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडला. राज्यातील अनेक पक्ष भाजपा फोडण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकारचे पक्ष फोडून भारतीय जनता पक्ष राज्यात वाढणार नाही. त्यामुळे भाजपा हा वैफल्यग्रस्त झालेला पक्ष असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर यांनी केला आहे. पक्ष न वाढणं हे त्यांचं दुखणं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यानं खळबळ : शरद पवारांनी अजित पवारांच्या संदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यात चिंतेचं वातावरण आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर संशय घेण्याऐवजी भाजपासोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं ते पाहावं. भाजपा सरकरामध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये नैराश्य निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नाही. कारण पवारांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काॅंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवार यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची संधी होती. मात्र त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. विरोधकांशीही ते तितक्याच आपुलकीने बोलतात, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -