ETV Bharat / state

Eknath Shinde : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का; स्थानिक नेते पदाधिकारी शिंदे गटात - स्थानिक नेते पदाधिकारी शिंदे गटात

शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला ( Shinde group shocked Thackeray group ) आहे. नाशिकचे स्थानिक नेते शिंदे गटात गेले ( Local Leaders Join Shinde group in Nashik ) आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. आम्ही मेंढरे नाहीत हे लवकरच दाखवून देऊ असा पलटवार संजय राऊतांवर केला.

Shinde group Shock Thackeray group
शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का
author img

By

Published : Jan 6, 2023, 3:26 PM IST

शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का

मुंबई : शिंदे गटाचे ठाकरे गटाला एकामागून एक धक्के सुरूच ( Thackeray group shocked Shinde group ) आहेत. एकनाथ शिंदे गटात सातत्याने ठाकरे गटातून पदाधिकारी कार्यकर्ते जाण्याचा प्रवाह काही कमी होताना दिसत नाही. आज नाशिकच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि नेतेमंडळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात प्रवेश केला. नाशिक मधील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, संघटक, शाखाप्रमुख, वाहतूक सेना, युवा सेनेच्या पदाधिकारी आणि नेतेमंडळी मिळून जवळपास 60 जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला ( Local Leaders Join Shinde group in Nashik ) आहे.

महाराष्ट्रात लोकहिताची कामे : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार लोकहिताची कामे करत ( Public welfare works in Maharashtra ) आहे. जनतेचा विश्वास राज्य सरकारवर असल्यानेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे त्या पक्षातील कार्यकर्ते नेतेमंडळी सातत्याने बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात त्या पक्षातून येणाऱ्या लोकांचा प्रवाह वाढणार असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदेंचा टोला : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने लोकहितवादी निर्णय घेतले. शेतकरी कष्टकरी महिला सर्वच वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून पुन्हा एकदा आमच्या सरकारने केला. मात्र वेगवेगळ्या विषयावरून अधिवेशनात गोंधळ घालण्याचा प्रयत्न विरोधकांचा होता. हे सरकार जनतेसाठी काम करत आहे. याची धास्ती विरोधकांनी घेतली असल्याचा टोल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

आम्ही मेंढरे नाहीत हे लवकरच दाखवून : आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत मात्र ते नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच मोठ्या प्रमाणात नाशिकच्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की पक्षातली काही मेंढरं इकडे तिकडे जात आहेत. मात्र आम्ही मेंढरं नाहीत नाशिक मधील शिवसैनिक आहोत त्यामुळे लवकरच खासदार संजय राऊत यांना आम्ही मेंढरं नाही आहोत हे दाखवून देऊ असा इशारा स्थानिक नाशिक विधानसभा प्रमुख योगेश बेलदार यांनी दिला ( Eknath Shinde criticize Sanjay Raut ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.