ETV Bharat / state

Unemployment : रोजगाराबाबत सरकराकडून खोटी माहिती; बेरोजगारीवरून ठाकरे गटाची सरकारवर टीका - unemployment

Unemployment : देशातील वाढत्या बेरोजगारीवरुन ठाकरे गटानं सरकारवर टीकास्त्र सोडलंय. केंद्रातील मोदी सरकारसह राज्य सरकार रोजगाराबाबत खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटानं केलाय. देशासह राज्यात सरकरानं किती तरुणांना रोजगार दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Unemployment
Unemployment
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 9:01 PM IST

मुंबई Unemployment : गेल्या वर्षी 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली होती. शिंदे गटानं शिवसेनेतून बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर विविध कारणांवरून शिंदे गट-ठाकरे गट आमनेसामने आले. शिंदे गटाच्या सोळा अपात्र आमदारांचं प्रकरणावरुन ठाकरे गटानं वारंवार टीकास्त्र सोडलंय. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थीत केले आहेत. देशातील विविध प्रश्नावरुन त्यांनी मोदी सरकारसह शिंदे, फडणवीस अजित पवारांवर निशाना साधलाय. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या अधिकृत X पोस्टवर बेरोजगारीबद्दल सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. देशासह राज्यात सरकरानं किती तरुणांना रोजगार दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

देशातील बेरोजगारीचं प्रमाण किती टक्के? : ऑक्टोबर 2023 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 10.05 वर पोहचलाय, असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' या संस्थेनं प्रकाशित केलेली ही नवीनतम आकडेवारी आहे. एकीकडं सरकार देशातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खोट्या जाहिराती करत आहे. तर, दुसरीकडं देशाचं धगधगतं वास्तव समोर आलं आहे, अशी पोस्ट ठाकरे गटानं X वर टाकत भाजपावर निशाना साधलाय.

महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही : बेरोजगारीचं प्रमाण देशासह राज्यातही सारखंच आहे, असा दावा ठाकरे गटानं केला आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती काही वेगळी नाही, हक्काचे उद्योग परराज्यात पाठवून तरुणांचं भविष्य खड्ड्यात घातलं जातंय. द्वेषाचं राजकारण करून स्वतःचे खिसे भरणारं घटनाबाह्य सरकार तरुणांच्या हाताला काम कधी देणार? असा संतप्त सवाल ठाकरे गटानं उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

मनिषा कायंदेंचा प्रतिहल्ला : राज्यातील बेरोजगारीवर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रतिहल्ला केला. ज्यांनी अडीच वर्ष घरात बसून सरकार चालविलं. त्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीय. राज्यात शिंदे सरकार आल्यापासून बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. "फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण नंबर 1 होतो. उद्धव ठाकरे सरकारमध्ये आपण हा क्रमांक घालवला होता. तसंच ठाकरे गटाने ज्या वेबसाईटचा दाखला दिला, ती आकडेवारी मागील महिन्यातील आहे. सदर वेबसाईटनुसार अनएम्प्लॉयमेंट रेट 9.4 आहे. नवी मुंबई येथे क्लस्टर डायमंड इन्वेस्टमेंटमध्ये 20 हजार कोटीची गुंतवणूक आपण करत आहोत. बेरोजगारीचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये 1.9 नं कमी झाल्याचा दावा कायंदे यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त
  2. Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; मुंबईला हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था
  3. Gram Panchayat Election 2023 : सत्ताधारी भाजपाला जर मीडियाकडे जावं लागत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश - सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.