मुंबई : राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या ( Measles has Taken a Terrible Form in State ) संख्येत वाढ झाली ( Number of Measles Patients has Increased in State ) आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार २४१ गोवरचे संशयित रुग्ण ( 12,241 Suspected Patients have Detected in Maharashtra ) आढळून आले आहेत. ७४५ रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे. तर १८ बालकांचा गोवरमुळे मृत्यू ( 18 Baby have Died Due to Measles ) झाला आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे, पिंपरी-चिंचवड हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यात गोवरमुळे मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
राज्यात एकूण १२,२४१ संशयित रुग्ण, त्यातील १८ मृत्यू : राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर या वर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत १२ हजार २४१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ७४५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत, तर १८ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १२, भिवंडीत ३, ठाण्यात २ तर वसई-विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १८ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्यांच्या ५, १२ ते २४ महिन्यांच्या १०, २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षांच्या २ तसेच ५ वर्षांवरील १ बालकाचा मृत्यू झाला आहे. १८ मृत्यूंपैकी ८ मुली तर १० मुलगे आहेत.
जिल्हानिहाय गोवरचा प्रसाराचा आलेख पाहूया : मुंबईत ४०७२ संशयित रुग्ण असून, ३२३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ८९४ संशयित रुग्ण असून, ७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ८८३ संशयित रुग्ण असून, ४८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ५७४ संशयित रुग्ण असून, ४४ निश्चित निदान झाले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई उपनगर भागांमध्ये गोवरचा वाढता आलेख : ठाणे जिल्हा येथे १३८ संशयित रुग्ण असून, १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई-विरार मनपा येथे १९६ संशयित रुग्ण असून, ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत, तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १५२ संशयित रुग्ण असून, ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २४७ संशयित रुग्ण असून, १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.
गोवरचा उद्रेक झालेली इतर महत्त्वाचे जिल्हे : औरंगाबाद येथे १२३ संशयित रुग्ण असून, १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे २५६ संशयित रुग्ण असून, ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. बुलढाणा येथे २४ संशयित रुग्ण असून २ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. मीरा भाईंदर येथे १७२ संशयित रुग्ण असून ३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. रायगड येथे ११५ संशयित रुग्ण असून ६ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.
१३ लाख लसींचा साठा : राज्यात गोवर प्रभावित विभागात ११२१ सर्व्हेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ११ लाख १९ हजार ९७५ घरे सर्वेक्षण करण्यात आली आहेत. २६ हजार ४७७ बालकांना व्हिटामिन ए चा डोस देण्यात आला आहे. गोवर रुबेलाचा ९७४२ बालकांना पहिला, तर ७६४४ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात एकूण १३ लाख ५३ हजार ८२० लसींचा साठा आहे.
केंद्र सरकार सूचना : देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यांवरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा, अशा सूचना केल्या आहेत.