ETV Bharat / state

राज्यातील आमदारांसाठी देशी-विदेशी भाषांची शिकवणी; 22 जूनला होणार लोकसभेच्या उपक्रमाचे उद्घाटन

बोलीभाषा न समजल्यामुळे अनेकदा अडचणी येतात. लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास आणि प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

mantralaya
मंत्रालय
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:40 PM IST

मुंबई - लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व आमदार व विधानभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकवणी वर्ग येत्या २२ जूनपासून भरविण्यात येणार आहेत. जर्मन, फ्रेंच, जपान, रशियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय तर बंगाली, गुजराती, मराठी, ओडिया, तमिळ, तेलुगू या राष्ट्रीय भाषांचा यात समावेश आहे.

22 जूनला शुभारंभ -

बोलीभाषा न समजल्यामुळे अनेकदा अडचणी येतात. लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास आणि प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. क्षमता अभिवृद्धी कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आमदार व विधानभवनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देशी-विदेशी भाषा शिकण्यासाठी ऑनलाइन वर्ग शिकवले जाणार आहेत. २२ जूनला या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा - हिवरेबाजारचा आणखी एक 'आदर्श' निर्णय.. कोरोनाने सर्व शाळा बंद असताना गावात वाजली शाळेची घंटा

'असे' भरतील वर्ग -

प्रत्येक आठवड्याला 75 मिनिटांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. 22 जून 2021पासून सकाळी दहा ते सव्वा अकरा आणि साडे अकरा ते दुपारी १२:४५ या वेळेत वर्ग भरतील. तर ५ जुलैपासून दुपारी अडीच ते पाऊणे चार आणि दुपारी चार ते पाच या वेळेत वर्ग भरणार आहेत. हे सर्व वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील. विशेष म्हणजे आमदार आणि विधान भवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही या भाषा शिकण्याची संधी उपलब्ध असेल, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा - महापौरांच्या कामाची घेतली "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"ने दखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.