ETV Bharat / state

शिक्षकांना दिलासा, आता वर्क फ्रॉम होमची सवलत

मुंबईतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही. त्यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेता आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीची अट शिथिल केली आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jun 28, 2021, 8:02 PM IST

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही. त्यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेता आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीची अट शिथिल केली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

आता शिक्षकांना वर्क फ्रॉम होम -

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. याकडे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे राज्याचे शिक्षण संचालक व मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण निरीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार, ५० टक्के उपस्थितीची अट वगळली आहे. आता शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. शिक्षकांना घरूनच ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांवर आर्थिक भार -

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबईतील शाळांमधील ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात निवास करणाऱ्या शिक्षकांनी खासगी गाड्यांनी प्रवास केला. ठाणे, पालघर व नवी मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतर्गत काम करणारे शिक्षकही स्वः खर्चाने खासगी गाड्यांनी प्रवास करत आहेत. त्यासाठी मोठा आर्थिक भार शिक्षकांना पडत होता. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनासाठी वर्क फ्रॉम होम करू देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली होती.

'शाळेच्या ओळखपत्रावर लोकल प्रवास करू द्या'

'ज्या शाळांची दहावी मूल्यमापनाची कामे राहिली असतील, अशा शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल कार्डच्या किचकट प्रक्रियेपेक्षा दहावीची कामे होईपर्यंत शाळेच्या ओळखपत्रावरच तिकीट द्यावे', अशी मागणी अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

असा आहे आदेश -

'माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इयत्ता पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती; तर इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचान्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली होती. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने मुंबई विभागातील महानगर क्षेत्रांतर्गत असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, बसई-विरार, मीरा भाईदर व पनवेल या महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवासासाठी उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ५० टक्के उपस्थितीच्या अटीपासून सवलत देण्यात येत आहे', असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - Delta Plus Variant : 'डेल्टा प्लस'वर लस प्रभावी? सात दिवसात येणार निष्कर्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.