ETV Bharat / state

Taran Singh Struggle Story : रेल्वेच्या चाकांनी उद्ध्वस्त केले पण व्हीलचेअरच्या चाकांनी सावरले, तरण सिंगचा प्रेरणादायी संघर्ष - Taran Singh Mumbai

तरण सिंग या तरूणाचा रेल्वेतून पडून अपघात झाला आणि त्याला अपंगत्व आले होते. यानंतर त्याने आयुष्यात आलेल्या संकटांचा निर्भीडपणे सामना केला आहे. तरण सिंगने इतरांप्रमाणे निराश न होता या अपंगत्वावर मात करत मुंबईत सोया चापचा व्यवसाय सुरू केला आहे.

Taran Singh Story
तरण सिंग
author img

By

Published : Mar 28, 2023, 7:05 PM IST

Updated : Mar 28, 2023, 10:49 PM IST

तरण सिंग माहिती देताना

मुंबई : मुंबई हे अतिशय वेगवान आणि धावपळीचे शहर आहे. इथे प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर आपली कामे करत असतो. इथे अनेकजण गावातून आपली स्वप्न घेऊन येतात. मुंबईत आल्यावर प्रत्येकाला सामना करावा लागतो तो म्हणजे इथल्या लोकल ट्रेनच्या गर्दीचा. मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची मुख्य वाहिनी मानली जाते. मात्र, याच रेल्वेतील गर्दीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे. ज्यांना अपंगत्व आले आहे त्यातले काही जण सावरले पण अनेक जण आजही जगण्याचा संघर्ष करत आहेत.

तरण सिंगचा संघर्ष : तरण सिंग या तरूणाचा रेल्वेतून पडून अपघात झाला आणि त्याला अपंगत्व आले. नेहमी असे म्हटले जाते की, ज्याला जन्मतः अपंगत्व असते त्याच्यात एक काही ना काही विशेष कला असते. त्या कलेच्या जोरावर ती अपंग व्यक्ती आपला जीवनाचा सामना करत असतो. मात्र, ज्यांना एखाद्याला अपघातामुळे अपंग येत त्यांचे काय? अशा लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा मोठा असतो. अनेकांचा हा जगण्यासाठीचा संघर्ष अद्याप देखील सुरू आहे. दरम्यान, रेल्वे अपघातामुळे तरण सिंगच्या आयुष्यात अनेक आव्हाने निर्माण झाली. मात्र, इतरांप्रमाणे निराश न होता या अपंगत्वावर मात करत तरणने मुंबईत सोया चापचा व्यवसाय सुरू केला आहे.

तरण सिंग रेल्वे अपघातमुळे अपंग : तरण सिंग या तरूणाने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले की, ही 2015 सालची घटना आहे. मी काही कामानिमित्त रेल्वेने चाललो होतो. लोकल ट्रेनला खूप गर्दी होती. अशात माझा अपघात झाला आणि मला अपंगत्व आले. मी 90% अपंग आहे. त्यामुळे माझे पुढील आयुष्यच हे दुसऱ्यांच्या सहकार्यावर आणि मदतीवर अवलंबून आहे. थोडे फार मला ज्या काही हालचाली करायच्या असतात त्या मी माझ्या व्हीलचेअरवर बसून करतो. मात्र, मला कोणतही काम करताना खूप त्रास होतो. माझे शरीर मला साथ देत नाही. मात्र, आता निराश न होता जे काही आपल्या सोबत घडलेले आहे ते स्वीकारून परिस्थितीशी संघर्ष करत आयुष्य जगणे हा मी निर्णय घेतला आहे.

सोया चापचा व्यवसाय : पुढे बोलताना तरण सिंग या युवकाने सांगितले की, माझा अपघात झाल्यानंतर पुढची काही वर्षे मी नैराश्यात होतो. त्यातच लॉकडाऊन लागले आणि सर्वांचेच आयुष्य बदलले. माझा भाऊ एका ठिकाणी कामाला होता त्याचा जॉब गेला. त्यानंतरच्या मधल्या काळात छोटी छोटी कामे सुरू होती. त्याच वेळी माझ्या डोक्यात 'चाप ऑन व्हील'ची संकल्पना आली. माझ्या भावाला या संदर्भात मी बोललो त्याला देखील माझी संकल्पना आवडली. आता माझे दोन भाऊ आणि काही मित्र यात सहकार्य करतात. माझा भाऊ या व्यवसायात माझा बॅक बोन आहे.

मुलासाठी आईचा संकल्प : पुढे बोलताना तरणने सांगितले की, माझा अपघात झाल्यानंतर मी पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू शकेल फिरू शकेल यासाठी माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले. बरेच डॉक्टर तसेच देविदेवतांच्या चरणी प्रार्थना करून झाले. मात्र, अद्याप मला काही फरक पडलेला नाही. माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी, मी पुन्हा एकदा चालू फिरू लागण्यासाठी माझ्या आईने एक व्रत ठेवले आहे. जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत ती चप्पल घालणार नाही. माझ्या तब्येतीत काही फरक पडेल की नाही मला माहिती नाही. पण माझ्यावर माझ्या आईचे प्रेम हे यातून दिसून येते.

भविष्यातील नियोजन : तरणने त्याच्या भविष्यातील योजनांबाबत सांगितले की, माझ्या मित्रांच्या आणि भावंडांच्या सहकार्याने माझा व्यवसाय सध्या व्यवस्थित सुरू आहे. आमच्या भागातील लोकांचा देखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्या इथे शंभर रुपयांपासून सोया चाप सुरू होतात. मग त्यात विविध फ्लेवर, विविध प्रकार या सोया चापचे आमच्या इथे मिळतात. आत्तापर्यंत दहा ते बारा लोक शाखेसंदर्भात विचारून गेले. मात्र, सध्या तरी कोणतीही आणि कुठेही शाखा सुरू करण्याचे आमच्या मनात नाही. या व्यवसायात काही बदल करणे गरजेचे आहे. ते झाले की आम्ही पुढचा विचार करू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना खंडणी मागणारा अटकेत; 'ही' महत्वाची माहिती समोर

Last Updated : Mar 28, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.