मुंबई - ॲमेझॉन प्राईमची वेब सीरीज तांडवमध्ये हिंदू भावनांना दुखावल्याचा आरोप करत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत बुधवारी सकाळी दाखल झालेले आहे. तांडव वेब सीरीजचा निर्माता दिग्दर्शक व चित्रपटाशी संबंधित काही कलाकारांची चौकशी यूपी पोलिसांच्या या पथकाकडून केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
वेब सीरिज निर्मात्यांचा माफीनामा
दरम्यान, तांडव वेब सिरीजमध्ये हिंदू धर्माविषयी भावना दुखविण्यात आल्यानंतर यासंदर्भात भाजपा नेते राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा देत या संदर्भात पोलिसांनी कारवाई करावी म्हणून मागणी केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल होण्याअगोदरच तांडव वेब सीरिज बनविणाऱ्यांकडून यासंदर्भात बिनशर्त माफी मागण्यात आलेली आहे.
प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं आहे
तांडव निर्मात्यांकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले आहे की ही, वेब सीरिज पूर्णपणे काल्पनिक असून कुठल्याही जिवंत व्यक्ती किंवा घटनेच्या संदर्भात याचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तांडव निर्मात्यांकडून कुठलीही व्यक्ती, जात, समुदाय किंवा धार्मिक भावनांना दुखावण्याचा किंवा अपमानित करण्याचा कुठलाही इरादा नसल्याचे निर्मात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
हेही वाचा - अभिनेत्री शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप
हेही वाचा - सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार