मुंबई : धोबीघाट येथील साईबाबा नगर, महालक्ष्मी येथे फेज 1 मध्ये सुमारे 1000 कुटुंबांना नवीन घरे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये 19 रिटेल युनिट्स देखील आहेत. या एसआरए प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन टॉवरमध्ये हस्तांतरित करताना, धोबीघाटाच्या सीमेवरील सोसायट्यांमधील सुमारे ५ हजार रहिवाशांचा त्यात समावेश आहे.
झोपडपट्टीतील रहिवाशांना निवारा : महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेला, हा गृहनिर्माण प्रकल्प टप्प्याटप्प्याने साधारण १६ हजार झोपडपट्टीतील रहिवाशांना निवारा देणार आहे. धोबीघाट हा जगातील सर्वात मोठ्या मैदानी खुल्या लॉन्ड्रींपैकी एक आहे. परिसरातील बहुतेक रहिवासी लॉन्ड्री-आधारित सेवांमध्ये गुंतलेले आहेत. हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी भागातील १२ एकर जागेवर पसरलेला आहे. या टॉवरमधून रेसकोर्स व अरबी समुद्राचे अथांग दर्शन होते. पिरामल रियल्टी आणि ओमकार बिल्डर्स यांच्या संयुक्त उपक्रम प्रकल्प असून प्रामुख्याने धोबी आणि डाईंग, सुकवणे, वाहतूक, इस्त्री इत्यादी संबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या फायद्याचा असणार आहे. हा प्रकल्प वारसा स्थळापासून १५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे, तरीही त्याचे नैसर्गिक सौंदर्य कायम आहे.
यांच्यासाठी मोकळ्या जागा : या संपूर्ण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे अत्याधुनिक बांधकाम असून या प्रकल्पातून कल्याण केंद्रे, सोसायटी कार्यालये आणि बालवाडी यांच्यासाठी मोकळ्या जागा असणार आहेत. पुनर्वसन विकासासाठी गुणात्मक मापदंड देखील प्रकल्पात निश्चित करण्यात आला आहे. हा ४-टॉवरचा एसआरए प्रकल्प अग्रगण्य जर्मन ब्रँड ‘शिंडलर’च्या १६ उद्वहनाने देखील (लिफ्ट) सज्ज आहे.
धोबी व्यवसायातील मजूरांचा टॉवर : धोबी व्यवसायाची वार्षिक उलाढाल वार्षिक अंदाजे १२५ कोटी रुपये आहे. रहिवाशांचा एक मोठा गट त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लाँड्री व्यवसायाशी संबंधित आहे. नव्या पिढीतील अर्ध्याहून अधिक धोबी पारंपरिक कौटुंबिक व्यवसायातून बाहेर पडले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे धुण्याच्या आणि वाळवण्याच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे कपडे धुण्याची पारंपरिक धोबी पद्धत कालबाह्य होत आहे. धोबी धुलाईमध्ये त्यांचे कौशल्य सुधारत आहेत. ज्यासाठी कमी प्रमाणात पाणी लागते आणि आरोग्य धोक्याची शक्यता कमी होते. या प्रकल्पातील बहुतांश रहिवासी हे धोबी व्यवसायातील आहेत. तर जगातील पहिलाच सर्वात उंच असा हा प्रकल्प असणार आहे.
हेही वाचा -
- Supertech Twin Towers Demolition Today नोएडातील सुपरटेक ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त, ३७०० किलो स्फोटकांचा वापर, तयारी पूर्ण
- Twin Tower Demolition एक बटन दाबताच ध्वस्त होणार नोएडातील ट्विन टॉवरची अवाढव्य इमारत, चेतन दत्ता दाबणार बटन
- 'असा' असेल वरळीतील बीडीडीवासियांचा 'फ्लॅट', 22 मजल्यांचे पॉश टॉवर्स