ETV Bharat / state

Talathi Recruitment Exam : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी पीएचडी धारकांचे अर्ज

राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी 10 लाख दहा हजार ५३ उमेदवार परिक्षेला ( Talathi Recruitment Exam ) बसणार आहेत. यात एमबीए, पीएचडी, बीएएमएस, बीएचएमएस आणि अभियांत्रिकी सारख्या पात्रता असलेल्या उमेदवारांनी ( Talathi Recruitment ) अर्ज दाखल केल्याची माहिती परिक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे.

Talathi Recruitment Exam
Talathi Recruitment Exam
author img

By

Published : Aug 9, 2023, 11:06 PM IST

पुणे : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक ( Talathi Recruitment Exam Schedule ) आणि तलाठी (गट-क) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केल्या आहेत. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस अगोदर पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल. या परिक्षेसाठी एमबीए, पीएचडी, बीएएमएस, बीएचएमएस आणि अभियांत्रिकी पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक जाहिर : राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी 10 लाख ५३ हजार उमेदवार ( Talathi Recruitment Exam ) बसणार आहेत. या उमेदवारांना योग्य पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असेल. ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव आधीच कळेल आणि तीन दिवस आधी प्रवेशपत्रासह परीक्षा केंद्र दिसेल.

परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा : परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेतली जाईल, असे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, असेही रायते म्हणाले.

हेही वाचा - 'आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.