ETV Bharat / state

प्रिन्स प्रकरणाचे गूढ वाढले..! नातेवाईकांना भेटण्यास केईएम प्रशासनाकडून मज्जाव

उपचारासाठी म्हणून त्याचे पालक नोकरी सोडून मुंबईत आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, याबाबत केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी काहीच बोलण्यास नकार दिला. एक दोन दिवसात चौकशीचा अहवाल येईल इतकेच त्यांनी सांगितले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रिन्सच्या पालक, नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना भेण्यासाठी डीनची लेखी परवानगी घेऊन या तरच भेटू दिले जाईल असे वॉर्ड नंबर 1 (आयसीयू) बाहेरील सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

प्रिन्स - केईएम रुग्णालयातील दुर्घटनेत हात गमवावा लागलेला चिमुरडा
author img

By

Published : Nov 15, 2019, 7:56 AM IST

Updated : Nov 15, 2019, 9:32 AM IST

मुंबई - केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशमधून आलेल्या प्रिन्स हा तीन महिन्याचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजला गेला. या दुर्घटनेत जखमी झाल्याने त्याचा एक हात आणि कान कापावा लागला. याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद उमटल्यावर प्रिन्ससोबत असलेल्या पालकांना, नातेवाईकांना कोणालाच भेटू देऊ नका, असा फतवाच रुग्णालय प्रशासनाने काढला. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढू लागले आहे.

नातेवाईकांना भेटण्यास केईएम प्रशासनाकडून मज्जाव

आठवडाभरापूर्वी केईएम रुग्णालयात एसीजीवर उपचार घेत असताना मशिनमध्ये बिघाड होऊन चार महिन्याच्या चिमुकल्या प्रिन्सचा हात भाजला. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात काढून टाकावा लागला आहे. या दुर्घटनेबाबत रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अधिष्ठाताकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र संबंधित डीनवरच निलंबनाची कारवाई करून चौकशी करावी. तसेच प्रिन्सच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व उपचाराचा संपूर्ण खर्च तातडीने द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. यावर दोषींवर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

सध्या प्रिन्सची प्रकृती कशी आहे. उपचारासाठी म्हणून त्याचे पालक नोकरी सोडून मुंबईत आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, याबाबत केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी काहीच बोलण्यास नकार दिला. एक दोन दिवसात चौकशीचा अहवाल येईल इतकेच त्यांनी सांगितले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रिन्सच्या पालक, नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना भेण्यासाठी डीनची लेखी परवानगी घेऊन या तरच भेटू दिले जाईल असे वॉर्ड नंबर 1 (आयसीयू) बाहेरील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. एका सुरक्षा रक्षकाने तर मीडियाला रुग्णालयात यायलाच परवानगी नसल्याचे सांगितले. डॉ. देशमुख यांना लेखी पत्र देऊन प्रिन्सच्या पालकांना भेटण्याची परवानगी मागितली असता, त्यांनी लेखी परवानगी देण्यास नकार दिला आहे. याबाबत पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता, मी या प्रकरणाची चौकशी करत असल्याने बोलणे योग्य ठरणार नाही. तुम्ही डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येकाकडून उडवाउडवी केली जात असल्याने प्रिन्स प्रकरणाचे गुढ वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वीही एमआयआर मशीनमध्ये अडकून झाला होता एकाचा मृत्यू

पालिकेच्या रुग्णालयात या आधीही नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकल्याने मारू नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कूपर रुग्णालयात उंदरांनी चावा घेतल्याने काही रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत. नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठांच्या जाचाला आणि जातीय त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यातच आता केईएम रुग्णालयात प्रिन्स नावाचा चार महिन्याचा बालक शॉकसर्किटने आग लागून भाजला असून त्याचा एक हात आणि कान कापण्यात आला आहे. इतके प्रकरण गंभीर असताना आता रुग्णालय प्रशासन त्या बालकाच्या नातेवाईकांना भेटण्यास कोणालाच देत नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:मुंबई - केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशमधून आलेल्या प्रिन्स हा चार महिन्याचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजल्याने त्याचा एक हात आणि कान कापण्यात आला आहे. याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद उमटल्यावर प्रिन्ससोबत असलेल्या पालकांना, नातेवाईकांना कोणालाच भेटू देऊ नका असा फतवाच रुग्णालय प्रशासनाने काढल्याने या प्रकरणाचे गुढ वाढू लागले आहे. Body:आठवडाभरापूर्वी केईएम रुग्णालयात एसीजीवर उपचार घेत असताना मशिनमध्ये बिघाड होऊन चार महिन्याच्या चिमुकल्या प्रिन्सचा हात भाजला. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करुन हात काढून टाकावा लागला आहे. या दुर्घटनेबाबत रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अधिष्ठाताकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र संबंधित डीनवरच निलंबनाची कारवाई करून चौकशी करावी. तसेच प्रिन्सच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व उपचाराचा संपूर्ण खर्च तातडीने द्यावा अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. यावर दोषींवर कारवाई केली जाईल असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

सध्या प्रिन्सची प्रकृती कशी आहे. त्याचे पालक नोकरी सोडून मुंबईत आहेत. ते कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, याबाबत केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच बोलण्यास नकार दिला. एक दोन दिवसात चौकशीचा अहवाल येईल इतकेच त्यांनी सांगितले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रिन्सच्या पालक, नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भेण्यासाठी डीनची लेखी परवानगी घेऊन या तरच भेटण्यास दिले जाईल असे वॉर्ड नंबर 1 (आयसीयू) बाहेरील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. एका सुरक्षा रक्षकाने तर मीडियाला रुग्णालयात यायलाच परवानगी नसल्याचे सांगितले. डॉ. देशमुख यांना लेखी पत्र देऊन प्रिन्सच्या पालकांना भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांनी लेखी परवानगी देण्यास नकार दिला आहे. याबाबत पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क साधला असता मी या प्रकरणाची चौकशी करत असल्याने बोलणे योग्य ठरणार नाही. तुम्ही डॉ. देशमुख यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले.

पालिकेच्या रुग्णालयात या आधीही नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकल्याने मारू नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कूपर रुग्णलयात उंदरांनी चावा घेतल्याने काही रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत. नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठांच्या जाचाला आणि जातीय त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यातच आता केईएम रुग्णालयात प्रिन्स नावाचा चार महिन्याचा बालक शॉकसर्किटने आग लागून भाजला असून त्याचा एक हात आणि कान कापण्यात आला आहे. इतके प्रकरण गंभीर असताना आता रुग्णालय प्रशासन त्या बालकाच्या नातेवाईकांना भेटण्यास कोणालाच देत नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमीसाठी रुग्णालयाचे vis आणि p2cConclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 9:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.