ETV Bharat / state

जागतिक एमएस दिन : २५-३५ वर्षे वयोगटातील तरुणाईमध्ये आढळणारा 'हा' आजार; जाणून घ्या 'लक्षणे'

एमएस आजारामध्ये रुग्णाच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होत असोत. त्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होत असते.

सौजन्य - विकिपीडिया
author img

By

Published : May 30, 2019, 8:18 AM IST

मुंबई - तरुणाईमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा आजार फोफावत चालला आहे. या आजाराच्या रुग्णाला उपचार मिळावे यासाठी मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय) या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ३० मे रोजी जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस साजरा केला जातो. त्यानिमित्त बुधवारी मुंबई पत्रकार संघ येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजाराबद्दल माहिती देताना मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या सदस्या

निदान, नवीन औषधे आणि उपचार यामुळे एमएस आजार काही प्रमाणात बरा होऊ शकतो. या आजारामध्ये केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होत असोत. त्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होत असते. या आजाराचे प्रमाण जास्तीत जास्त २५ -३५ वर्ष वयोगटातील तरुणाईमध्ये पाहायला मिळते. तसेच मुलांपेक्षा मुलींना जास्त त्रास होत असतो.

आजाराची लक्षणे -

  1. नजर धूसर होणे
  2. लघवीवर नियंत्रण न राहणे
  3. थकवा
  4. गरगरणे
  5. बोलायला त्रास होणे
  6. चालताना त्रास होणे
  7. कुठलीही गोष्ट समजून घेण्याची क्षमता लोप पावणे

कारणे -
अनुवांशिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे एमएसची लागण होऊ शकते. गेल्या काही काळामध्ये एमएसची लागण होण्याचा वयोगट २५- ३५ वर्षांचा राहिलेला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण १:२ इतके असल्याचे मुंबईतील जसलोक रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. एस. एम. कात्रक यांनी सांगितले.

रुग्णांची अधिक संख्येने नोंद -
भारतामध्ये सध्या १ लाख लोकांमध्ये ७-१२ लोकांना एमएसची लागण झाल्याचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने अद्यापही ग्रामीण भागामध्ये या रोगाचा कितपत प्रादुर्भाव आहे? याची माहिती उपलब्‍ध नाही. मात्र, न्यूरोलॉजिस्ट्समध्ये या व्याधीबाबत जागरुकता वाढली आहे. तसेच एमआरआय तपासण्यांची सोयदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये एसएसच्या रुग्णांची अधिक संख्येने नोंद होऊ लागली आहे.

लक्षणे अदृश्य असल्याने अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण -
गेल्या २०१६ ला एमएस या व्याधीला भारताच्या अपंगत्व कायद्यामध्ये स्थान मिळाले. पण अनेकांना या गोष्टीची माहिती नाही. शिवाय एमएसची लक्षणे अदृश्य असल्याने रुग्णांना अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे अपंगत्वाचे मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एमएसमधील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. तसेच एमएसच्या रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळावे यासाठी या अधिकाऱ्यांनी रुग्णांना मदत करणे आवश्यक असल्याचे बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रीसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश खाडीलकर यांनी सांगितले.

एमएस रुग्णांना ६० टक्क्याहून अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे -
एमएस व्याधीच्या रुग्णांचे आयुष्य अडथळ्यांनी भरलेले असते. पुढे काय घडणार याची कल्पनाही त्यांना नसते. या व्याधीची लक्षणे अदृश्य असल्याने कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सामाजिक पातळीवर त्यांना असमानतेची वागणूक दिली जाते. समाजाकडून होणाऱ्या हेटाळणीला तोंड देण्यासाठी आम्ही अशा रुग्णांचे समुपदेशन करतो. एमएसची तीव्रता मोजताना केवळ अपंगत्वाची टक्केवारी मोजणे हा एकमेव निकष ग्राह्य धरता येणार नाही. कारण हे रुग्ण अदृश्य लक्षणांना सामोरे जात असता. अपंग कल्याण आयोगाने अशा रुग्णांच्या व्यथा समजून घेणे. तसेच त्यांना ६० टक्क्याहून अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, अशी विनंती मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने करण्यात आली.

Intro:मुंबई ।

मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) हा आजार फोफावत चालला आहे. या आजाराच्या रुग्णाला उपचार मिळावे यासाठी मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय) या संघटनेने पुढाकार घेतला. आज बुधवारी जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनानिमित्त मुंबई पत्रकार संघ येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या आजराबद्दल प्रबोधन करण्यात आले.या कार्यक्रमाला एमएसएसआयचे राष्ट्रीय सचिव डॉ. एस एम कात्रक, डॉ. सतीश खाडिलकर, एमएसएसआयच्या सह- संस्थापक शीला चिटणीस उपस्थित होते.Body:निदान, नवीन औषधे आणि उपचार या पर्यायांची उपलब्धता एमएस रूग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकते. एमएस ही एक अशी स्थिती आहे जी केंद्रीय मज्जासंस्था (प्रामुख्याने मेंदू आणि मज्जारज्जू) वर परिणाम करते ज्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होते. तरुणांमध्ये एमएसचे प्रमाण जास्त आहे मुलांपेक्षा मुलींना जास्त त्रास होतो. एमएस हे त्यांच्या शरीराच्या महत्त्वपूर्ण भागांच्या कार्यप्रणालीवर परिणाम करत आहे
आजाराची लक्षणे : नजर धूसर होणे, लघवीवर नियंत्रण राहणे, थकवा,गरगरणे, बोलायला त्रास होणे, चालायला कष्ट पडणे,माहिती समजून घेण्याची क्षमता लोप पावणे

रुग्णांची अधिक संख्येने नोंद :
भारतामध्ये सध्या एमएसचे प्रमाण 100,000 लोकांमध्ये 7-12 असावे, असा अंदाज आहे. ही आकडेवारीसुद्धा अपूर्ण आहे, कारण ग्रामीण भागामध्ये या रोगाचा कितपत प्रादुर्भाव आहे याची माहिती उपलब्‍ध नाही. मात्र न्यूरोलॉजिस्ट्समध्ये या व्याधीविषयीची जागरुकता वाढल्याने तसेच एमआरआय तपासण्यांची सोय उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये अशा रुग्णांची अधिक संख्येने नोंद होऊ लागली आहे.
कोट:
एमएसची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक अनुवांशिक आणि दुसरे पर्यावरणीय. गेल्या काही काळामध्ये एमएसची लागण होण्याचा वयोगट २५- ३५ वर्षांचा राहिला असून स्त्री-पुरुषांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण १:२ इतके आहे असे या स्थितीबद्दल बोलताना मुंबईतील जसलोक हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. एस. एम. कात्रक यांनी सांगितले.
^^^^^&&
२०१६ साली एमएस या व्याधीला भारताच्या अपंगत्व कायद्यामध्ये स्थान मिळाले. पण अनेकांना या गोष्टीची माहिती नाही. शिवाय एमएसची लक्षणे अदृश्य असल्याने रुग्णांना अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड कष्टांतून जावे लागते. म्हणूनच अपंगत्वाचे प्रमाणन (मोजमाप) करणा-या अधिका-यांनी या स्थितीच्या परिणामामधील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. दृश्य लक्षणे सिद्ध करण्याच्या खडतर प्रयासांमधून जावे न लागता अपंगत्व प्रमाणपत्र मिळावे यासाठी या अधिका-यांनी अशा रुग्णांना मदत करणे आवश्यक आहे. बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रीसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश खाडीलकर यांनी सांगितले.
^^^^^^^
'अपंग कल्याण आयोगाने अशा रुग्णांच्या व्यथा समजून घ्यावात'
'एमएस व्याधीच्या रुग्णांचे आयुष्य अडथळ्यांनी भरलेले असते. पुढे काय घडणार याची कल्पनाही त्यांना नसते. या व्याधीची लक्षणे अदृश्य असल्याने कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सामाजिक पातळीवर त्यांना असमानतेची वागणूक दिली जाते. समाजाकडून होणा-या हेटाळणीला तोंड देण्यासाठी आम्ही अशा रुग्णांना समुपदेशन पुरवतो. खरेतर या व्याधीला अपंगत्व कायद्यामध्ये स्थान मिळाले आहे. तरीही अदृश्य लक्षणामुळे त्यांचा शारीरिक स्थितीचा योग्य प्रकारे स्वीकार होण्यामध्ये अडथळे येतात. एमएसची तीव्रता मोजताना केवळ अपंगत्वाची टक्केवारी मोजणे हा एकमेव निकष ग्राह्य धरता येणार नाही, कारण हे रुग्ण अकल्पित लक्षणांना सामोरे जात असता. अपंग कल्याण आयोगाने अशा रुग्णांच्या व्यथा समजून घ्यावात आणि त्यांना ६०% हून अधिक अपंगत्व प्रमाण लागू करावे अशी आमची विनंती आहे. प्रत्येक परिसर हा अधिकाधिक अपंग- स्नेही बनावा यादृष्टीने जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.