ETV Bharat / state

मानसिक तणाव असतानाही सुशांतचे उपचाराकडे दुर्लक्ष, नव्हते कुठलेही आर्थिक संकट - सुशांत सिंह राजपूत मृत्यू

सुशांत सिंह राजपूत याची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि मित्र महेश शेट्टी यांच्याशी पोलीस संवाद साधत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत व रिया हे दोघे लवकरच लग्न करणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुशांत व रिया यांच्यात भांडणे सुरू होती. शनिवारी सुशांतने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने त्यांचा कॉमन मित्र महेश शेट्टी याला फोन केला होता. मात्र, दोघांनीही फोन उचलला नसल्याचे समोर आले आहे.

sushant singh rajput suicide  shushant singh rajput death  sushant singh rajput latest news  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  सुशांत सिंह राजपूत मृत्यू  सुशांत सिंह राजपूत लेटेस्ट न्यूज
सुशांत सिंह राजपूत
author img

By

Published : Jun 15, 2020, 12:14 PM IST

Updated : Jun 15, 2020, 1:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनानंतर आलेल्या प्राथमिक अहवालानुसार त्याने आत्महत्या केल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाले आहे. त्याच्या घरातून मिळालेल्या वैद्यकीय कागदपत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून तो हायपर टेंशन आणि मानसिक तणाव या दोन आजारांनी ग्रासलेला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी दिलेले कुठलेही औषध तो घेत नसल्याचे समोर आले आहे. त्याच्या बँक खात्यावरून त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा असल्याचे समोर आले आहे. तो कुठल्याही आर्थिक संकटात नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस 'या' लोकांचा नोंदवणार जबाब -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी त्याच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या घरात २ स्वयंपाकी आणि क्रिएटिव्ह मॅनेजर हजर होते. त्यांचा जबाब देखील पोलिसांना नोंदवला आहे. सुशांत सिंह याच्या घरातून ज्या डॉक्टरचे वैद्यकीय कागदपत्र मिळाले आहेत, त्या डॉक्टरांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिचा देखील पोलीस जबाब घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी २४ तासांत ज्यांच्याशी संपर्क साधला होता, अशा सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी करणार आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तो कुठल्याही अंमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचे आढळून आले आहे.

रिया चक्रवर्ती सोबत करणार होता लग्न -

सुशांत सिंह राजपूत याची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि मित्र महेश शेट्टी यांच्याशी पोलीस संवाद साधत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत व रिया हे दोघे लवकरच लग्न करणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुशांत व रिया यांच्यात भांडणे सुरू होती. शनिवारी सुशांतने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने त्यांचा कॉमन मित्र महेश शेट्टी याला फोन केला होता. मात्र, दोघांनीही फोन उचलला नसल्याचे समोर आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुशांतला त्याच्या वडिलांनी लग्न करण्याबाबत विचारले होते, त्यावेळी त्याने होकार कळविला होता. मात्र, त्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jun 15, 2020, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.