मुंबई - पवार कुटुंबामध्ये कधीच दुरावा नव्हता. सर्व काही चांगले होईल, जे होईल ते देश आणि राज्यासाठी चांगलेच होईल. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज होती. विरोधकांचा आवाज आम्ही कधीच दाबणार नाही. तसेच 'आगे आगे देखो होता है क्या?' असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
हेही वाचा - इस्त्रायली अग्निशमन तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत होणार करार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे या तीनही पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.
हेही वाचा - 'महा'शपथविधी सोहळा LIVE : आज विधानसभेचे १ दिवसीय अधिवेशन; ८ वाजता आमदारांचा शपथविधी