ETV Bharat / state

Supriya Sule Criticize BJP : आघाडीच्या इंडिया नामांतरणाने केंद्रातील सत्ताधारी गोंधळले - सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका

Supriya Sule Criticize BJP : केंद्रातील भाजपा सरकारला लोकसभा 2024 साली सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपा विरोधातील पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केलीय. इंडिया आघाडी शब्दाचा धसका भाजपानं घेतल्याचं बोललं जातंय. केंद्र सरकारच्या कार्यक्रमादरम्यान इंडियाऐवजी भारत नावाचा वापर केल्याचं पाहायला मिळतंय. अशा प्रकारच्या नाव बदलण्याच्या कृतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधलाय.

Supriya Sule Criticize BJP
सुप्रिया सुळे आणि शरद पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 10:44 PM IST

मुंबई Supriya Sule Criticize BJP : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कविवर्य ना.धों. महानोर यांना गीत व कवितांच्या माध्यमातून भावांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल, कवी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ना.धों. महानोर, जब्बार पटेल आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ना.धों. महानोर यांच्या निधनानंतर त्यांचे विचार पुढच्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने त्यांची आठवण म्हणून शरद पवार यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कार कमिटीवर जब्बार पटेल असल्याचं यावेळी शरद पवार यांनी जाहीर केलंय.

इंडिया नावाने पॅनिक : इंडिया शब्दाऐवजी भारत नावाचे फोटो समोर आलेत. 'इंडियाऐवजी भारत' नाव बदल करण्यामागं सरकारच्या मनात नेमकं काय आहे, याविषयी आमच्याकडे चर्चेला काही आलं नाही. जेव्हा चर्चेला प्रस्ताव येईल, तेव्हा बघू असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. भाजपा विरोधातील आघाडीला इंडिया नाव दिल्यानं ते घाबरले, असं मी म्हणणार नाही. मात्र, पॅनिक झाल्याचं नक्की दिसत आहे. याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. अजित पवार गटाकडून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार असल्याचा दावा केलाय. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याबाबतचं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही. त्यामुळं त्यावर बोलणं सयुक्तिक ठरणार (BJP Government over alliance india naming) नाही.

'तर' राज्य सरकारचे स्वागत करीन : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. ही चांगली गोष्ट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचं स्वागत केलंय. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाविषयी प्रश्न, राज्यातील बेरोजगारी, महागाई सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील दुष्काळ अशा प्रकारचे आव्हानं देशासमोर आणि आपल्या राज्यासमोर आहेत. त्याबद्दलही महाराष्ट्र सरकारनं काही भाष्य केलं, तर त्याचं देखील मी स्वागत करेन, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

दडपशाही असल्याचं वातावरण : लोकशाहीवर मी विश्वास ठेवते. लोकांना देशात दडपशाही वाटते. दिल्लीत तर खूपच दडपशाही असल्याचं वातावरण तयार झालंय. लोकशाहीवर विश्वास ठेवणारी, आदर ठेवणारी मी व्यक्ती आहे. मी मनमोकळेपणाने बोलेलं. त्यातून एक मोठा अर्थ काढण्याची गरज नाहीये. या देशामध्ये दुर्दैव आहे की, लोक हसायला विसरलेत. आनंदी राहायला विसरलेत. प्रत्येक गोष्टीसाठी राग द्वेष आहे. अरे जीवनात खुश रहा, जीवन सुंदर आहे. थोडं हसायला शिका, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना (Supriya Sule criticize BJP Government) केलंय.

गणेशोत्सव काळात विशेष अधिवेशन : केंद्र सरकारनं बोलावलेल्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर झालीय. त्यानंतर आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती की, अधिवेशनाच्या काळात नेमका दहा दिवसांचा गणपती उत्सव असतो, आपण दुसरी तारीख द्यावी. पण अजेंडा नाही, झिरो आवर नाही, त्यामुळे कसलं अधिवेशन आहे, ते माहीत नाही. अधिवेशनाला गेल्यावर कळणार आहे की, अधिवेशन कशाचं आहे. मात्र, इंडिया आघाडीकडून भारत सरकारला एक अजेंडा पाठविण्यात आलाय. त्यात देशातील नागरिकांचा मान सन्मान आणि देश हिताचा विचार केलाय. भलेही त्यांचा अजेंडा नसेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला टोला लगावलाय. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षण हे भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये सामाविष्ट आहेत. भारतीय जनता पार्टीची राज्यात सात वर्षे आणि केंद्रात नऊ वर्षे सत्ता आहे. अशा प्रकारे केंद्रात बहुमत असताना आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायला हवा, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. Supriya Sule On Ajit Pawar: 'राष्ट्रवादी'मध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे.. - सुप्रिया सुळे
  2. Supriya Sule On Sharad Pawar: शरद पवार कालही योद्धा होते, आजही योद्धा आहे आणि उद्याही राहणार- सुप्रिया सुळे
  3. Supriya Sule : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, घराणेशाही...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.