मुंबई : भारतीय जनता पक्षाविरोधात आपल्याला लढायचे आहे. भाजप देशात सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे. शरद पवारांनी फक्त आशीर्वाद द्यावे, असे काही जण म्हणत आहेत. मात्र, रतन टाटा, सायरस मिस्त्री, अमिताब बच्चन, वॉरेन बफे, फारुक अब्दुला, यांच्या वयाचे उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे सगळ्या परिस्थितीत पक्ष बांधू. 2019 मध्ये हा 80 वर्षाचा येद्धा लढला. यानंतर भाजपला राज्यात दाखवून देऊ असे अव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. आजपासून आपली लढाई सुरू झाली आहे. भाजपने तुम्हाला काय दिले असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केला आहे.
आमदारांना व्हीप जारी : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्व आमदारांना व्हीप जारी करून बुधवारी महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास बजावले होते. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटानेही स्वतंत्र बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या बंडखोर आमदारांची मुंबईत बैठक झाली आहे. तर, शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी श्रीनिवास पाटील, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तणपुरे, आमदार रोहीत पवार यांची उपस्थिती आहे.