मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट त्यानंतर वारंवार अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीगाठी यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ठाकरे गट आणि काँग्रेसकडून केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळ्या वैचारिक दृष्टिकोनातून घेतलेली भूमिका वेगळी असेल त्यात मला गैर वाटत नसल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच राजकीय भूमिका वेगळी, मात्र कुटुंबात नाते एक असते अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
बैठकीत मी नव्हते : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात श्रद्धांजली वाहून आर.आर. पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीवेळी मी उपस्थित नसल्याने त्या बैठकीत काय झाले याची माहिती आपणास नसल्याचे, सुप्रिया सुळे यांनी बैठकीवर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच यावेळी चौरडिया आणि पवार कुटुंबातील नात्याबाबत माहिती दिली.
राजकीय मत वेगळे नाते वेगळे : अनेकवेळा लोकशाहीमध्ये राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नाते वेगळे असते. हे सांगताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि एन. डी. पाटील यांच्यातील नात्यासंदर्भातील आणि राजकीय विरोधाबाबत माहिती दिली. दोन्ही नेत्यांची टोकाची भूमिका असताना महाराष्ट्राने असे कधीही म्हटले नव्हते की, शरद पवार आणि एन. डी. पाटलांचे नाते काय. अशा प्रकारची प्रगल्भता आपल्या राज्यातील जनतेने दाखवून दोन्ही नेत्यांना स्वीकारले आहे. तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळे अजित पवार हे वेगळ्या वैचारिक बैठकीत बसत असतील तर लोकशाहीमध्ये आपण ते सर्वांनीच मान्य केले पाहिजे. आम्ही ज्या विचारांच्या बैठकीत बसतो काही मुद्द्यांपुरते अजित पवार याच्यापेक्षा वेगळे असू शकतात. त्याच्यात मला गैर काही वाटत नाही. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत दुरावा निर्माण होत असलेल्या आरोपावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत यांनी आज याविषयी स्टेटमेंट केले आहे. तसेच नवाब मलिक मला नाही वाटत ते तिकडे जातील, कारण नवाब मलिक यांच्यावर आरोप कोणी केले आणि सर्वात जास्त त्रास कोणी दिला सर्व महाराष्ट्राने बघितला आहे.
संभ्रम असला तरी मविआ एकत्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या पुणे येथील गुप्त बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपले मत मांडले. दोघांच्या भेटीमुळे निश्चित संभ्रम निर्माण झाला आहे. पण आघाडीतील घटक पक्ष एकत्र असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काका पुतणे यांच्या भेटीमुळे राज्यातील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, याबाबत शरद पवारांनी लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी. आमचे सोडा, सामान्य जनतेचा विचार करावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांना केले आहे. तसेच काँग्रेसने कोणताही ए, बी, सी प्लान तयार केला नाही. तसेच काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या निष्कर्षावर पोचली नसून आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -