ETV Bharat / state

Sunil Kawale Suicide Case : आत्महत्याग्रस्त सुनील कावळे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत; मंत्री दीपक केसरकरांची माहिती

Sunil Kawale Suicide Case : मराठा आरक्षणासाठी जालना येथील तरुणानं मुंबईत बुधवारी आत्महत्या (Sunil kawale Suicide) केली. या आत्महत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर कावळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

Sunil kawale Suicide
सुनील कावळे आत्महत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 6:24 PM IST

Updated : Oct 19, 2023, 6:36 PM IST

मुंबई Sunil kawale Suicide Case : मराठा आरक्षणासाठी लाखोंचे शांततेत मोर्चे पार पडले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. जरांगे-पाटील यांनी 150 एकर जागेवर सभा घेतली. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर आज मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील सुनिल बाबुराव कावळे (Sunil kawale Suicide) या मराठा तरुणाने मुंबईत आत्महत्या केली. या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी सरकारकडून मंत्री दीपक (Deepak Kesarkar) केसरकर हे सायन रुग्णायलाय गेले होते. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कावळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहिती केसरकर (Kesarkar On Sunil kawale Suicide Case) यांनी दिली.

कावळे कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत : मराठा आरक्षणासाठी प्रत्येक मोर्चात सहभागी असणाऱ्या सुनिल कावळे यांनी आत्महत्या केली, ही घटना खूप वेदनादायी आहे. आम्ही कावळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांना ही बातमी समजताच, त्यांनी मला माहिती घेण्यास सांगितले. मी कॅबिनेट बैठक सोडून येथे आलो आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, मृत कावळे कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येईल. तसेच त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी व मुलांचा शैक्षणिक खर्च सरकार करणार असल्याचं केसरकर म्हणाले. कावळे हे शिवसैनिक होते. म्हणून त्यांना शिवसेनेकडूनही आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.

सरकार अतिशय संवेदनशील : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, परंतू, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील आहे, पण कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागतात. पण मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, जेणेकरुन त्यांच्या कुटुंबांना दु:ख होईल. कावळे यांनी अगदी तरुण वयात ही टोकाची भूमिका घेतली आहे. रागाच्या भरात निर्णय घेऊ नये, असे आवाहन केसरकर यांनी मराठा समाजाला केले आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळेल... : आरक्षणासाठी सरकार आग्रही आहे, ज्या आंदोलकांवर खटले आहेत, ते मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पाऊलं उचलले आहेत. तसेच याबाबत मीसुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ज्या ओबीसींना सुविधा आहेत, त्या सर्व मराठ्यांना देण्यात आल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळेल, असा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.

आत्महत्या होणार नाहीत, याची जबाबदारी सरकारची : कोणत्याही समाजाने आरक्षणाची मागणी करणे योग्य आहे, पण टोकाची भूमिका कोणी घेऊ नये. आरक्षणाची लढाई कायदेशीर लढली पाहिजे. माझे राज्यातील तरुणांना आवाहन व विनंती आहे की, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये व आपला जीव देऊ नये. मराठा समाजाची जी मागणी आहे त्याची सरकारने पूर्तता करावी आणि पुन्हा अशा आत्महत्येच्या घटना घडणार नाही, याची काळजी सरकारनं घ्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करत आहोत, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

Maratha Reservation : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा मराठा समाजाला फायदा नाही - मनोज जरांगे

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या सभांचा कोणाला बसणार फटका?

Maratha Reservation Suicide: मुंबईत सणवार येत राहतील पण...मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची मुंबईत आत्महत्या

Last Updated : Oct 19, 2023, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.