मुंबई: मध्य रेल्वेमार्गावरील (On the Central Railway) भायखळा ते माटुंगा (Byculla Matunga) अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मध्य रात्री १२ वाजून ४० मिनिट ते पहाटे ५ वाजून ४० मिनिटांपर्यत मेगाब्लॉक (Sunday night megablocks) घेण्यात आला आहे. या दरम्यान सकाळी ५.२० वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ती सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचेल. तर शनिवारी रात्री १०.५८ ते रात्री ११.१५ पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील पण साधारण १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.५ ते ४. ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर गोरेगांव ते सांताक्रूझ स्थानकाच्या अप जलद मार्गावर रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक रविवारी मध्य रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय डाऊन जलद मार्गावर मध्य रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा गोरेगांव आणि सांताक्रूझ स्थानकांच्या दरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसाकालीन कोणताही मेगाब्लॉक नसणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.