ETV Bharat / state

महादेव अ‍ॅप प्रकरण; 57 बँक खाती केली ब्लॉक, अभिनेता साहिल खानला लवकरच पाठवणार समन्स? - अभिनेता साहिल खान

Mahadev Betting App Case : महादेव अ‍ॅप प्रकरणात बुधवारी सकाळी, रवी उप्पलला दुबईत ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली. आता साहिल खानने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आज त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यामुळं येत्या एक दोन दिवसात गुन्हे शाखा अभिनेता साहिल खानला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

Mahadev Betting App Case
महादेव अ‍ॅप प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 8:19 PM IST

मुंबई Mahadev Betting App Case: महादेव अ‍ॅप प्रकरणात गुन्हे शाखेकडे माटुंगा पोलीस ठाण्यातून (Matunga Police Station) गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर शाखेच्या ३ अधिकाऱ्यांची एसआयटी नेमण्यात आली आहे. उत्तर सायबर विभागातील अधिकारी या विशेष तपास पथकात (एसआयटी) असून या तपासात 139 बँक खात्यांची पडताळणी करण्यात आली. यातील 57 बँक खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याला लवकरच समन्स पाठवणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

32 जणांवर गुन्हा दाखल : 'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' या चित्रपटातील अभिनेता साहिल खानने, महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी माटुंगा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी, बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील एक आरोपी म्हणून साहिल खानचे नाव आले होते. तसेच सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यासह इतर 32 जणांवर मुंबईच्या माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू : प्रकाश बनकर यांनी दावा केला आहे की, आरोपींनी खिलाडी बेटिंग ॲप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी ॲपच्या सहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली. आता याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरुद्ध ईडीने 'मनी लाँड्रिंग'चा गुन्हाही नोंदवला आहे. याबाबत ईडीकडून देशातील वेगवेगळ्या राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू आहे.

आरोपींची संख्या ३७ : एफआयआर'मध्ये एकूण 32 जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग केल्यानंतर आरोपींची संख्या ३२ वरून ३७ वर गेली आहे. आरोपींमध्ये पंजाबचे रोहितकुमार मुरगई, दुबईचे कुमार राठी, छत्तीसगडचे शुभम सोनी, छत्तीसगडचे अतुल अग्रवाल, पश्चिम बंगालचे विकास चपरिया, मुंबई माटुंगाचा अमित शर्मा, दुबईचे लाला राठी, छत्तीसगडचे अभिषेक राठी, मुंबईतून खानजम ठक्कर, दिल्लीचा अमित जिंदल जैन, छत्तीसगडचा चंद्र भूषण वर्मा, गुजरातचा अमित मजिठिया, लंडनमधील दिनेश राठी, मुंबईतील छंदर, दुबईतील बेदी राठी, पंजाबचा राजीव राठी, दुबईतील कृष्णा राठी आणि बऱ्याच आरोपींचा समावेश आहे.

आरोपींची नावे : मुख्य आरोपी असलेले सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघेही छत्तीसगडमधील आहेत. मुंबईचा अमित बॉम्बे, लंडनमधील दिनेश खंबाट, दुबईतील चंदर अग्रवाल, मुंबईतील मोहित बर्मन, दुबईतील हेमंत सुद, मुंबईतील गौरव बर्मन, अहमदाबादमधील हरेशभाई कलाभाई चौधरी, दुबईतील भरत चौधरी, दुबईचा अमर राठी, मुंबईचा रणवीर रॉय, मुंबईचा हितेश खुसालनी, मुंबईचा साहील खान आणि सॅम खान, अमृतसरचा राजीव भाठीया, मुंबईतील वसीम कुरेशी, दुबईचा किश लक्ष्मीकांत आणि माटुंगाचा एक अनोळखी इसमाचा यात समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Mahadev Betting App Case : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरण; अभिनेता साहिल खानसह उद्योगपती मोहित बर्मनवर गुन्हा दाखल
  2. Mahadev Book App Scam : महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसात पहिला गुन्हा; 15,000 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  3. kangana ranaut : महादेव अ‍ॅप प्रकरणात ३४ सेलिब्रिटींना कंगना राणौतनं खडसावलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.