ETV Bharat / state

पुण्यात धक्कादायक प्रकार; फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला काढलं बाहेर

कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकांना शाळेच्या फी भरता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शाळांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फी भरण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र, हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे, असे असतानाही शाळेकढून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे.

student was expelled from the school for not paying the fee pune
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला काढलं बाहेर
author img

By

Published : Oct 4, 2021, 3:10 PM IST

Updated : Oct 4, 2021, 4:47 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षापासून बंद असलेली शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. आजपासून शाळा सुरू झाल्याने पुणे शहरातील काही शाळांनी मुलांचे औक्षण करून तर काहींनी चॉकलेट देऊन स्वागत केले. असे असताना पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शाळेची फी न भरल्यामुळे पहिल्या दिवशी शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली. त्यामुळे शाळेबाहेर पालकवर्ग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया

कोरोनामुळे बहुतांश जणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकांना शाळेच्या फी भरता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शाळांकडून गेल्या अनेक दिवसांपासून फी भरण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र, हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे, असे असतानाही शाळेकढून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे. गेल्या दीड वर्षापासून शहरात फी माफीसाठी आणि सवलत मिळावी यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, काही शाळांच्या माध्यमातून तर ऑनलाईन शाळा बंद करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, असेच प्रकार पाहायला मिळाले. आम्ही फी भरणार आहोत. मात्र, शाळेने काहीतरी सवलत दिली पाहिजे. अशापद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केली आहे.

घटनास्थळाची दृश्ये

हेही वाचा - शाळा सुरु करण्याचा निर्णय आव्हानात्मक; मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद

पालकांना मुदत देण्यात येणार -

दोन ते तीन वर्षापासून विद्यार्थ्यांनी फी अजून हि भरलेली नाही.पत्रव्यवहार देखील अनेक वेळा करण्यात आले आहे.आम्ही पूर्ण फी भरण्यासाठी सांगत नाही तर शक्य जस होईल तशी फी भरावी.असं आवाहन आम्ही पालकांना केलं होत.तरी येणाऱ्या काळात पालकांना फी भरण्यासाठी मुदत वाढवून देणार असल्याचं प्राचार्य रेणुका दत्ता यांनी यावेळी सांगितलं आहे.

मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये -

राज्यात आजपासून शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळानी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. घडलेला प्रकार हा संपूर्णपणे विरोधाभास झालेला आहे. मुलांना अशा पद्धतीने शिक्षणापासून अडवले जाऊ नये. तसेच पुढील काळामध्ये अशापद्धतीने अडवणूक केली गेली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यावेळी महापालिकेच्या शिक्षण अधिकारी सचिन काळे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 4, 2021, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.