ETV Bharat / state

Student dies during Kabaddi: मालाडमध्ये कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

मालाड परिसरातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. कबड्डी खेळत असतानाच 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. मालाड येथील महापालिकेच्या लव गार्डन मध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली.

Student dies during Kabaddi
कबड्डी खेळाडू
author img

By

Published : Feb 10, 2023, 9:52 PM IST

Updated : Feb 10, 2023, 10:32 PM IST

मुंबई: मालाड येथील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. किर्तिकराज मल्लन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेनंतर त्याचे पार्थिव शिवचरणासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

कार्तिक बी.कॉमचा विद्यार्थी : मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक हा दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बी.कॉम. प्रथम वर्ष शिक्षण घेत होता. कार्तिकला मित्तल विद्यालयाच्या वतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिक राज या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

खेळताना झाला बेशुद्ध : आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज दरम्यान कबड्डीचा सामना सुरू असताना कार्तिक मित्तल कॉलेजच्या वतीने खेळत होता. कार्तिक हा आकाश कॉलेजच्या खेळाडूंच्या खेम्यामध्ये डेडलाईन पार करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना समोरील खेळाडूंनी त्याला पकडले. त्यावेळी तो बाद देखील झाला होता. मात्र तो माघारी फिरत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न असफल राहिले. विद्यार्थ्यांनी ताबडतोब मालाड पोलिसांना या घटनेची सूचना दिली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्तिकला जवळील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. डॉक्टर आणि त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आंध्रातही घडली होती अशीच घटना: आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यात एका कबड्डीपटूचा चालू सामन्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 17 जानेवारी, 2021 रोजी घडली होती. नरेंद्र असे नाव असलेला हा कबड्डीपटू कडपा जिल्ह्यातील गगन्नपल्लीच्या वालुरू मंडळ येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. या सामन्यात नरेंद्रने चढाई केली असताना विरुद्ध संघाने त्याला पकडून खाली पाडले. त्यानंतर तो उठला आणि काही पावले चालल्यावर खाली कोसळला. या घटनेनंतर आयोजकांनी तत्काळ नरेंद्रला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टेबल टेनिस खेळाडूचा मृत्यू : कोल्हापूर येथेही अशीच घटना घडली होती. येथे आयोजित ११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 18 सप्टेंबर, 2022 रोजी कोल्हापूरच्या एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२), असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली होती. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२) हा राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली होती. गेल्या अकरा वर्षांत प्रथमच या स्पर्धेला गालबोट लागले होते.

हेही वाचा : Sharad Pawar : केंद्र शासनाने आणलेला 'तो' कायदा होऊ देणार नाही; शरद पवारांचा इशारा

Last Updated : Feb 10, 2023, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.