मुंबई- जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) खळबळजनक घटना घडली. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्ष आयुशी घोष गंभीर जखमी झाल्या. या प्रकारानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. गेट वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन रविवारी रात्री उशिरा सुरू झाले असून अद्यापही गेट वे जवळ हे विद्यार्थी ठाण मांडून बसले आहेत.
हेही वाचा- जेएनयू हिंसाचार : सर्वच स्तरातून निषेध
देशात घडणार्या घटनांबद्दल विद्यार्थ्यांनी राग व्यक्त केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, जेएनयूमध्ये घडलेल्या हाणामारीचा निषेध करत निदर्शने सुरू केली आहे. या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे.