ETV Bharat / state

जे जे रुग्णालयातील डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली; डॉक्टरांनी घेतला संप मागे

J J Hospital Doctors Strike : मागील ११ दिवसांपासून जे जे रुग्णालयाचे त्वचा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या हकालपट्टीसाठी आंदोलनाला बसलेल्या निवासी डॉक्टरांनी गुरुवारी आपला संप मागे घेतला आहे. डॉक्टर महेंद्र कुरा यांच्यावर निवासी डॉक्टरांनी गंभीर आरोप केले होते. त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नव्हती. अखेर निवासी डॉक्टरांच्या वाढत्या दबाव कारणास्तव प्रशासनाने डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली करण्याचा निर्णय घेत तसे परिपत्रक जारी केले. यानंतर अखेर निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.

J J Hospital
जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 9:29 PM IST

मुंबई J J Hospital Doctors Strike : जे जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा (Dr Mahendra Kura) यांना रुग्णालयातून हटविण्याच्या मागणीसाठी मागील १८ डिसेंबरपासून ‘मार्ड’चे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर होते. त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या छळाला कंटाळून निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. डॉक्टर कुरा हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत जोपर्यंत जे जे रुग्णालयातून त्यांची हकालपट्टी केली जात नाही, तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला होता. गुरुवारी या त्वचा विभागातील डॉक्टरांना इतर विभागातील डॉक्टरांनी सुद्धा साथ दिली. जे जे समूहाशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयातील जवळपास ९०० डॉक्टर संपावर होते. अखेर डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली करण्यात येत असल्याची घोषणा जे जे समूहाकडून करण्यात आल्यानंतर, मार्डच्या डॉक्टरांनी गुरुवारी रात्री उशिरा संप मागे घेतला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा निष्फळ : मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील (J J Hospital) त्वचा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभारा विरोधात करत निवासी डॉक्टरांनी मागील १० दिवसांपासून सामूहिक रजा आंदोलन केले होते. आज या डॉक्टरांच्या साथीला अन्य विभागातील डॉक्टरांनी सुद्धा समर्थन दिल्यानंतर जवळपास ९०० निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. जे जे रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा हे निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, रुणांचे मृत्यू, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना नापास करण्याची धमकी, त्याचप्रमाणे सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि कुरा यांच्याकडून सातत्याने होणारा त्रास, अशा विविध कारणास्तव जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मागच्या मंगळवारी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सुद्धा आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली. पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. अखेर हे सर्व निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले. त्याचबरोबर जोपर्यंत डॉक्टर महेंद्र कुरा यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला होता.

संप मागे घेतल्याची घोषणा : विशेष म्हणजे डॉक्टर महेंद्र कुरा यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत याप्रकरणी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सुद्धा जाहीर करण्यात आला नव्हता. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी काहीच तोडगा न निघाल्याने ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला. त्वचा विभागातील डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर डॉक्टर महेंद्र कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. परंतु तरीसुद्धा जोपर्यंत त्यांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार मार्डने घेतला. अखेर आज डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली औरंगाबाद येथे करण्यात आली आहे. डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली करण्यात आल्याचं परिपत्रक जे जे प्रशासनकडून काढण्यात आल्यानंतर आज सायंकाळी हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा मार्ड करून करण्यात आली.

कारवाई करण्यास उशीर केला : हा संप मागे घेतल्यानंतर या आंदोलनाबाबत बोलताना मार्डचे प्रवक्ते, डॉक्टर अभिजीत हेळगे म्हणाले की, डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या छळाला कंटाळून आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला होता. वास्तविक ही कारवाई यापूर्वीच व्हायला हवी होती. परंतु याबाबत प्रशासनाने निष्काळजीपणा केला. डॉक्टर महेंद्र कुरा यांच्यावरील आरोप गंभीर होते. ते सातत्याने मानसिक छळ, त्याचबरोबर अनुत्तीर्ण करण्याची धमकी देणे असे प्रकार करत होते. अखेर आज याबाबत प्रशासन जागे झाले असून त्यांची बदली करण्यात आली आहे. या कारणास्तव आम्ही आमचा संप आज मागे घेतला असून त्वरित कामावर रुजू झालो आहोत. आज ‘मार्ड’ने संप जरी पुकारला असला तरी अतिदक्षता विभागामधील सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु या संपामुळे बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभागातील सेवेवर आज थोडाफार परिणाम नक्कीच दिसून आला.

हेही वाचा -

  1. Corona Update : राज्यावर कोरोना महामारीचे सावट; मुंबईच्या जे जे रुग्णालयात झाले मॉक ड्रिल
  2. जे जे रुग्णालयातील 900 डॉक्टर जाणार संपावर; नेमकं कारण काय?
  3. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यातील वादातील प्रकरणावर 20 वर्षानंतर उद्या होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.