मुंबई - राज्यात आता कडक गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही परराज्यातून अवैध गुटखा येत आहे. त्याचे शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधीत गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि अवैध व्यवसायातील सूत्रधारावर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
पोलीस आणि अन्न औषध विभाग आता संयुक्तपणे साठेबाजांविरोधात कारवाई करणार आहे. मागील काळात या विभागात मंत्री असताना आम्ही कठोर कायदे केले होते. परंतू, भाजपच्या गुटका माफिया मोकाट सुटल्याचा आरोप देशमुख यांनी केला. पनवेलमधील महिला जळीतकांड प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. कोरेगाव-भीमाची केस अद्याप एनआयएकडे हस्तांतरीत झाली नाही. यासंदर्भात पुणे कोर्टात केस चालू आहे. त्यानंतरच निर्णय होईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
हेही वाचा- माटुंगा रेल्वेस्थानकावर युवतीचा विनयभंग; चुंबन घेतल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
हेही वाचा- फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसेंचाही फोन टॅप?
मंत्र्यांच्या सुरक्षेवर बोलताना गृहमंत्री म्हणाले, की त्याची कमिटी आहे. कोणत्याही मंत्र्यांच्या बाबत जर धोका असेल तर सुरक्षा देऊ. अनेक सहकारी मागणी करत आहेत. यासंदर्भात अनेक पत्रे मिळाली असल्याचे देशमुख म्हणाले.