ETV Bharat / state

वांद्रे-पश्चिम बसस्थानकात तणावपूर्ण शांतता; चोख पोलीस बंदोबस्त तैनात - bandra-west violence latest news

मंगळवारी दुपारी 4 वाजता वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकबाहेरील बस स्थानकात अचानक अंदाजे 2000 स्थलांतरीत मजूर जमले होते. यावेळी त्यांनी घरी जाण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणात गोंधळ केला होता. यानंतर आज (बुधवारी) वांद्रे-पश्चिम बसस्थानकात तणावपूर्ण शांतता पाहावयास मिळाली. याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वांद्रे-पश्चिम बसस्थानकात तणावपूर्ण शांतता

author img

By

Published : Apr 15, 2020, 1:15 PM IST

Updated : Apr 15, 2020, 1:26 PM IST

मुंबई - वांद्रे-पश्चिम येथे मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर या परिसराला छावणीचे रूप आले होते. आज (बुधवारी) येथील वांद्रे-पश्चिम बस स्थानकात तणावपूर्ण शांतता पहावयास मिळाली. मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर बुधवारी मात्र येथे आवश्यक तितकाच पोलीस बंदोबस्त आहे.

वांद्रे-पश्चिम बसस्थानकात तणावपूर्ण शांतता

मंगळवारी दुपारी 4 वाजता वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकबाहेरील बस स्थानकात अचानक अंदाजे 2000 स्थलांतरीत मजूर जमले. त्यांनी आपल्याला आपल्या गावी जायचे होते. म्हणून रेल्वे गाड्या सुरू करा, अशी मागणी करत त्यांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. यावेळी त्यांना समजावून सांगितल्यानंतरही हे मजूर ऐकत नसल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. मात्र, शेवटी पोलिसांनी ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.

हेही वाचा - वांद्र्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, 'त्या' लोकांची व्यवस्था सरकारने करावी - विरोधी पक्षनेत्यांची विनंती

याप्रकरणी 1 हजार अज्ञातांविरोधात वांद्रे-पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उत्तर भारतीय संघटनेचा नेता विनय दुबे याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Apr 15, 2020, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.