ETV Bharat / state

Orphan children : अनाथ बालकांच्या बाबत राज्य महिला बालविकास विभागाचे मौन

author img

By

Published : Dec 29, 2022, 7:00 PM IST

अनाथ मुलांच्या प्रश्नावर राज्याच्या महिला बालविकास विभागाने ( State Womens Child Development Department ) मौन बाळगले आहे. कोरोना महामारीमुळे ( corona epidemic ) राज्यात 5 हजार मुलांनी एक पालक गमावले आहेत. तर, 600 मुलांनी दोन्ही पालक गमावले आहेत. मात्र, महिला बालविकास अधिकारी ( Women Child Development Officer ) याबाबत बोलायला तयार नाहीत. सरकारने या मुलांबाबत अनाथांचा दर्जा जाहीर करावा, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Child Development
Child Development

मुंबई - जगभर कोरोना महामारीने ( corona epidemic ) थैमान घातले देशाने आणि राज्याने देखील त्याचा थरार अनुभवला आहे. देशामध्ये पंतप्रधानांनी टाळेबंदी घोषित केल्यामुळे अनेक हजारो लाखो मजूर आपापल्या राज्यात जाऊ लागले. त्यामुळे अनेक यातना वेदना लाखो लोकांनी अनुभवल्या. मात्र या कोरोना महामारीत ज्यांची आई-वडील वारले त्या बालकांची आज स्थिती काय आहे? यासंदर्भात राज्याच्या महिला बाल विकास विभागाच्या ( State Womens Child Development Department ) अधिकारी यांनी कोणतेही बोलणे टाळले. तसेच कोणतीही माहिती मिळणार नाही असे सांगितले जाणून घेऊया सविस्तरपणे

सर्वांनाच कोरोना महामारीने घेतले होते. आणि कोणाचे नातेवाईक केले तर कोणाचे मित्र गेले तर कोणाचे जवळचे लोक कोरोना महामारीमुळे निधन पावले. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेकडो बालके अनाथ झाली .आणि या अनाथ बालकांच्या संदर्भात शासनाने मदत करावी शासनाने त्यांचे पुनर्वसन करावे म्हणून प्रसार माध्यमे आणि जनता यांनी मागणी केली होती.शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना केल्या. 2021 मध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे ५ लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बकेत जमा केली जाणार आहे. या अनाथ मुलांना ही रक्कम त्यांच्या २१ व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. मात्र त्या बालकांची स्थिती आज काय आहे हे समजणे महत्वाचे आहे.सुमारे 5 हजार बालके असे आहेत ज्यांनी एक पालक गमावले तर 600 बालक असे आहेत ज्यांनी दोन्ही पालक गमावलेले आहेत.

महिला बाल विकास विभागाने माहिती देण्यास दिला नकार - मात्र या संदर्भातच आता पुन्हा कोरोना महामारीची लाट येण्याची शक्यता आहे. जागतिक आणि भारतातील तज्ञ व्यक्ती यांनी देखील ही भीती व्यक्त केली आहे. केंद्र शासनाने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देखील दिलेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर अनाथ बालकांची स्थिती राज्याच्या महिला बालविकास विभागाकडे विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे अनाथ बालकांची स्थिती नेमकी काय आहे याबाबत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.

महिला बाल विकास विभागाची आठमुठी भूमिका - महिला बालकल्याण विभागाच्या मिरासिस मॅडम या जबाबदार अधिकारी आहेत .यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने आज राज्यातील ईटीवीला प्राप्त झालेल्या माहितीनुसार 600 बालक अनाथ झाली होती या बालकांना संस्थांनी दत्तक घेतलेले आहे किंवा व्यक्तींनी .त्या बालकांची स्थिती काय आहे. या संदर्भात मिरसिस मॅडम महिला बाल विकास अधिकारी त्यांनी सांगितले की," आमच्याकडे कोणतीही माहिती नाही आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. दोन्ही पालक अनाथ झालेल्या बालकांचे पुनर्वसन योग्य रीतीने चालू आहे. परंतु आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला पत्र लिहा मग आम्ही त्याच्यावर विचार करू." असे ते म्हणाले.

कोणती माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही - या संदर्भात ईटीव्ही वतीने संबंधित अधिकारी यांच्याशी दूरध्वनी द्वारे जे संभाषण केलं त्यामध्ये त्यांना सांगितलं.बातमी करण्याच्या उद्देशाने शासन या बालकांच्या संदर्भात काय उपाययोजना करत आहे. आत्ता या बालकांची स्थिती काय आहे. त्यांचं संगोपन नातेवाईक पालक करत आहेत. की संस्थेच्या स्वरूपात त्यांचे पालक आहेत. याबाबत माहिती मिळाल्यास शासनाच्या उपक्रमांची सद्य स्थिती सुद्धा बातमीच्या अनुषंगाने पोहोचवता येईल. मात्र या विनंतीनंतर देखील त्यांनी म्हटले,"याबद्दल आम्ही माहिती देऊ शकत नाही आणि ती माहिती देता येणार नाही;" असा हेका धरला. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर कोणती माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही

सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली खंत - राज्यातील अनाथ बालकांच्या संदर्भात दोन वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी संस्था संघटनांची समन्वय केला होता. अशा बालकांना मदत होण्याच्या उद्देशाने काही एक पुढाकार घेतला होता त्यांच्याशी ईटीवी भारत वतीने या मुद्द्यावर संवाद साधला असता त्यांनी सांगितले की "राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे 600 च्या आसपास बालके अनाथ झाली होती. या बालकांना शासनाने संस्थांमार्फत प्रक्रिया करून दत्तक घेतले तर काही पालकांनी दत्तक घेतले. परंतु याबद्दलची माहिती संबंधित महिला बालविकास अधिकारी हेच खरं देऊ शकतात. त्यांनी ती द्यायला हवी. कारण त्याशिवाय जनतेला कळणार कसं. त्याच्यात चांगला उपाययोजना जर करायचे असतील तर, त्या कळणार कशा?" ज्या वेळेला जनता किंवा प्रसारमाध्यमा या संदर्भात शासनाचे काम कुठपर्यंत चालू आहे याचा लेखाजोखा मांडतात तेव्हाच जनतेला माहिती मिळते."

संवेदनाहीन शासन - याबाबत अखिल भारत शिक्षा अधिकार मंचाचे अक्षय पाठक यांनी देखील महिला बालविकास अधिकारी यांनी अनाथ बालकांच्या बाबत खंत व्यक्त केली ते म्हणतात की," जर शासनाने शेकडो अनाथ बालकांना दत्तक घेण्याबाबत संस्थांकडे आणि नातेवाईक पालकांकडे प्रक्रिया केली असेल तर आज त्या बँकांची स्थिती काय आहे कोणत्या नातेवाईकांकडे ते राहतात त्यांचे जगणे कसे आहेत त्यांचे शिक्षण त्यांचं आहार त्यांचा संगोपन याबाबत जर काही बदल झाला आहे विकास झाला आहे तर शासनाने त्याबद्दल माहिती द्यायला हवी."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.