ETV Bharat / state

जागतिक महिला दिन : राज्य महिला आयोगाकडून महिलांविषयक कायद्यांबाबत 5000 पुस्तिकांचे होणार वाटप

author img

By

Published : Mar 8, 2020, 4:32 PM IST

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला वर्गाला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण 2013 बाबत माहिती देणारी पुस्तिका, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 'झिरो टाँलरन्स फाँर सेक्शुअल हरासमेंट आँफ स्टुडंट अँन्ड वुमन इन काँलेज अँन्ड युनिव्हर्सिटीज' या इंग्रजी पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे.

राज्य महिला आयोग
राज्य महिला आयोग

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिलांविषयक विविध कायद्यांची माहिती सर्वाना व्हावी, या हेतूने 5000 पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. महाविद्यालये, शासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्थांना वाटप करण्यात येणार आहे. सोप्या भाषेत महिला विषयक कायद्याबाबत जनजागृती व्हावी, हा आयोगाचा प्रयत्न आहे.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिला वर्गाला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण 2013 बाबत माहिती देणारी पुस्तिका, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 'झिरो टाँलरन्स फाँर सेक्शुअल हरासमेंट आँफ स्टुडंट अँन्ड वुमन इन काँलेज अँन्ड युनिव्हर्सिटीज' या इंग्रजी पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे. आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लूथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 मार्च 2020 रोजी राज्य महिला आयोग आणि चेतना वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे जागतिक महिला दिन साजरा होणार आहे.

हेही वाचा - महिला दिन विशेष : आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील यांनी बँकिंग क्षेत्रात उमटविला ठसा

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा या पुस्तिकेत हिंसाचाराची व्याख्या स्पष्ट करणारे मुद्दे, महिलांचे अधिकार, समुपदेशन केंद्र, भारतीय दंड विधानातील (आय.पी.सी) विशेष तरतुदी यांची माहिती आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण या कायद्यांतर्गत कायद्याची माहिती, अंतर्गत तक्रार निवारण समितीची रचना, कार्य, स्वरुप, चौकशी प्रक्रिया या संकल्पना विषद करण्यात आल्या आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांतील महिलांनाही कायद्याने संरक्षण दिले आहे. प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्रजीत कायदा, विद्यार्थी तसेच शैक्षणिक संस्थांची भूमिका यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) असलेले निर्देश, सुचना याची ही विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.