ETV Bharat / state

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना - राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाद्वारे कोरोना संसर्ग होऊ नये, याबाबत उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या संदर्भात येत्या शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे मिटिंग आयोजित करण्यात आली आहे.

state level action force for traffic management
वाहतूक उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:24 PM IST

मुंबई - कोरोनामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आणि वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय कृती दलामध्ये अपर मुख्य सचिव (परिवहन),सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक)मुंबई, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाव्यवस्थापक मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, विविध ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनाचे प्रतिनिधी,अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, ओनर्स असोसिएशन मुंबई, वेब बेस्ड टॅक्सी (ओला, उबेरासह) चालक संघटनांचे प्रतिनिधी, बस अँन्ड कार ऑपरेटरर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया(BOCI)यांचे प्रतिनिधी, मुंबई बस मालक संघटनांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. परिवहन आयुक्त हे राज्यस्तरीय कृती दलाचे सदस्य सचिव असतील.

या राज्यस्तरीय कृती दलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतुकीशी संबंधित बाबीमुळे होणारा परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून उपाय योजना करणे आणि परिस्थितीनुसार वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणे,यासाठी या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे.

या संदर्भात येत्या शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.