मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आपला राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्यावर कार्यकर्त्या आणि नेत्यांमध्ये प्रेम,जोश, उत्साह भरल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार पहिल्यांदाच अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत होते असा भास कार्यकर्त्यांना होत होता अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक शंकर नारायण तीवारी यांनी दिली आहे .
अजित पवार दुखावले गेले? दोन मे रोजी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी कार्यकारी समितीच्या ठरावानुसार आपला राजीनामा काल मागे घेतला आहे. मात्र ज्या प्रकारे चित्र उपस्थित करण्यात आले. त्यानुसार ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळात असल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीत या प्रकारामुळे अजित पवार दुखावले गेले आहे असे वाटत आहे, असे तीवारी म्हणाले. अजित पवार सध्या घायाळ झालेले आहे. भविष्यात ते काही करणार नाही असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. शरद पवार यांनी राजीनामा देतेवेळी अजित पवार त्यांच्या बाजूला होते. त्या वेळी राजीनामा योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. अजित पवारांचे मत एका बाजूला तर, राष्ट्रवादी नेते, कार्यकर्ते हे एका बाजूला होते. त्यामुळे अजित पवारांना बाजुला केल्याच्या चर्चा सगळीकडे रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादीत राहून गेम करणार? अजित पवार आता काय करणार भाजपासोबत जाणार की राष्ट्रवादीत राहून गेम करणार हे ते स्वतःच याबद्दल निर्णय घेऊ शकतात. यासंदर्भात कोणीही भविष्यवाणी करू शकत नसल्याचं राजकीय विश्लेषक शंकर नारायण तिवारी यांनी सांगितले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार नेमके गेल्या दोन दिवसापासून शांत असल्यामुळे त्यांच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. भविष्यातील राजकारणात ते कोणते पाऊल उचलतात हा येणारा काळच ठरवणार आहे.
अजित पवार गायब असल्याच्या चर्चेला उधान : शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला तेव्हापासून अजित पवार गायब असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. अजित पवार नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यानंतर अजित पवार नाराज आहेत का असा सवाल विरोधक उपस्थित करीत आहे. राष्ट्रवादीचा पुढचा वारस कोण असणार? केंद्रात सुप्रिया सुळे तर राज्यात अजित पवारांकडे जबाबदारी देण्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे राष्ट्रवादीत काही चित्र वेगळे पहायला मिळणार आहे.
|