ETV Bharat / state

Theam Park Mumbai : राज्य सरकारमुळे रेस कोर्सच्या जागेवरील थीम पार्क लटकले - रेसकोर्स जागा मुंबई

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची सर्वाधिक जागा (race course site in Mumbai) राज्य सरकारची तर कमी प्रमाणातील जागा पालिकेची (BMC) आहे. त्यानंतरही ही जागा ताब्यात घेऊन त्यावर थिमपार्क उभारण्याची मागणी (Theam Park Mumbai) शिवसेनेने केली होती. भूखंडाची लीज संपल्याने ही जमीन ताब्यात घेऊन त्यावर थिमपार्क योजना राबवण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. रेसकोर्सला मुलुंड डंपिंग ग्राउंडची (Mulund Dumping Ground) जागा देण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. मात्र मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय अजूनही विचारधीन असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. (Latest news from Mumbai)

Theam Park Mumbai
थीम पार्क
author img

By

Published : Jan 7, 2023, 12:34 PM IST

मुंबई : महापालिकेचे सुमारे ४ हजार भूखंड भाडे कराराने दिले आहेत. यातील बहुतांशी भूखंडाचे नुतनीकरण २०१३ ला संपले आहे. करार संपूनही महापालिकेने (BMC) हे भूखंड अद्याप ताब्यात घेतलेले नाही. यातील अनेक भूखंडावर कराराचा भंग करून अनधिकृत बांधकाम केले आहे. घोड्यांच्या शर्यतीसाठी वापरण्यात येणारा महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भूखंड (race course site in Mumbai) महापालिकेने त्वरीत ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान निर्माण करावे अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क (Theam Park Mumbai) उभारण्याचा प्रस्ताव त्यावेळी राहुल शेवाळे यांनी ठरावाची सूचना मांडून रेसकोर्सचा भूखंड महापालिकेने ताब्यात घेण्याची सूचना केली होती. (Mulund Dumping Ground) महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब या कंपनीला ९९ वर्षाच्या लिजवर दिला होता. मात्र ही लीज करार संपल्याने त्यावेळी माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यासाठीचे पत्र दिले होते.

सर्वाधिकार राज्य सरकारला : महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदान रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब या कंपनीला ९९ वर्षाच्या लिजवर दिला होता. रेसकोर्सवरील ८.५ लाख चौरस मीटरपैकी २.५ लाख चौरस मीटर पालिकेच्या मालकीची आहे तर उर्वरित जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. रेसकोर्सवरील ७५ टक्के जमीन राज्य सरकारची व उर्वरित महापालिकेची आहे. त्यामुळे नुतनी करणे व त्यात बदल करावयाचा असल्यास राज्य सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक होते. पालिका महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊन राज्य सरकारने या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेतल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. तसेच राज्य सरकारने काढलेल्य़ा नव्या जीआरमुळे नुतनीकरणाचा अधिकार पालिकेकडे राहिलेला नाही. भाडेपट्टा कराराचे नुतनीकरण व नवीन अट अंतर्भूत करावयाचे असल्यास त्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास असून त्याची पूर्व परवानगी शासनाची असणार आहे. सरकारच्या या नव्या जीआरमुळे रेसकोर्सच्या भूखंडाचे पालिकेला नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे थीमपार्कचा प्रस्ताव राज्य सरकारकडे रखडला आहे.

रेसकोर्सची जागा मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न : थिमपार्कचे स्वप्न शिवसेनेचे होते. मात्र पालिकेत व राज्यात सत्ता असतानाही शिवसेनेला थिमपार्कचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. लीज संपल्यावर १० वर्षानंतर आता पुन्हा रेसकोर्सवर थिमपार्क उभारण्याबाबत पालिकेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
रेसकोर्स आता मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा परिसर साधारणपणे २४ हेक्टर इतका आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या जागेच्या बदल्यात त्यांना मुलुंड डंपिंग ग्राउंड येथील जागा देवून महालक्ष्मी येथील जागा पालिकेला थीम पार्क साठी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महालक्ष्मी येथील भूखंडाचा ताबा मिळवण्यासाठी पालिका राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. मात्र मुलुंड डंपिंग ग्राउंडचा पर्याय अद्यापही विचारधीन असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

मुलुंडला रेसकोर्स होणे शक्य नाही : मुलुंड डंपिंग ग्राउंडची जागा कमी आहे. त्या बाजूला असलेली खासगी जमीन आजच्या रेडीरेकनर नुसार खरेदी करून डंपिंग ग्राउंडला जोडावी लागणार आहे. रेसकोर्स चालवणे हा पालिकेचा किंवा राज्य सरकारचा सार्वजनिक उद्देश असू शकत नाही. खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी करदात्या नागरिकांचा पैसा खर्च केल्यास पालिकेवर टीका होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.