मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास पुढील पिढ्यांना माहिती असावा, त्यासोबत राज्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही इतिहासाची पूर्ण माहिती मिळावी. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक या ५ ठिकाणी शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
410 कोटींची तरतूद : शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थिम पार्क उभारण्यात येईल. 410 कोटींची तरतूद यासर्व कामांसाठी करण्यात आली आहे. सर्व कामे वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
राजकौशल्य संग्रहालय उभाणार : शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यासाठी ७० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. गोराई (मुंबई) २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभाणार येणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय उभाणार येणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय होणार आहे. तसेच नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय उभाणार जाणार आहे. रामटेक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपये करण्यात आली आहे. 15 कोटीची तरतूद भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी केली आहे.
निधींची तरतूद : कार्ला - आचार्य चाणक्य म्युझिअमसाठी ७५ कोटी रूपये तरतूद केली आहे. आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म निती व याचसोबत ७ दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी पडघा येथे निवासी व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळा व महाविदयालयात युवा पर्यटन क्लबची सोय केली जाणार आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात पर्यटन क्लब स्थापन केला जाणार करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयाजवळ असलेल्या पर्यटन स्थळांचे जतन करून जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी विभागामार्फत उपक्रम राबविले जाणार आहे.
योग दिवस साजरा करणार : २१ जूनला जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्व अनन्य साधारण आहे. सर्वसामान्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून योगाचे महत्त्व पटवून द्यावे. विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वाढवावी म्हणून राज्यातील सर्वच अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, महिला (गरोदर महिला नाही ) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा -