मुंबई- प्लास्टिकची फुले बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरण विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर सीएएबाबात राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सीएएबाबत जाणीवपूर्वक आंदोलने केले जात असून राज्यात आराजकता माजविली जात आहे. या कृत्याला फंडींग करणाऱ्यांविरोधात ईडीला पुरावे दिले आहे. मात्र, दिल्लीत सीएएबाबात मुख्यमंत्री समर्थन करतात आणि मुंबईत दबावाखाली येऊन समिती स्थापन करतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असताना उमर खालिद याने अमरावतीत नागरिकांना रस्त्यावर उतरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विरोध करा, असे आवाहन केले होते. या ठिकाणी दोन मंत्र्यांची देखील उपस्थिती होती. या कृत्याविरोधात राज्य सरकारने काय कारवाई केली? असा प्रश्न करत देवेंद्र फडणवीस यांनी सदर मंत्र्यांबाबात आपण पुरावा देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच हे सगळे काही मतांसाठी होत असलेले राजकारण असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. हेही वाचा- शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट! आयसीएआरकडून राज्य सरकारला अहवाल सादर