ETV Bharat / state

Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध उठवले - Ganesha devotees

राज्य सरकारने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियमांमधील गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा हटवली (government removed restrictions on Ganeshotsav) आहे. त्यामुळे मूर्तीकार आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणारा (Ganeshotsav starts from September 19) गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्याची तयारी सर्वत्र जोरात सुरू (Preparations for Ganeshotsav are underway) आहे.

Ganeshotsav
Ganeshotsav
author img

By

Published : Aug 13, 2023, 8:11 PM IST

बाळाराम पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : गणेशोत्सवाला आता महिना उरला (Ganeshotsav 2023) असून त्याची तयारी सर्वत्र जोरात सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने यंदा घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियमावलीतील गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा हटवल्याने (government removed restrictions on Ganeshotsav) मूर्तीकार आणि गणेशभक्तांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील गणेश कारखान्यात घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणपती मुर्त्या साकारण्याच काम जोरात सुरू (Preparations for Ganeshotsav are underway) आहे.

प्रदूषणाचे कारण पुढे करून : पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav starts from September 19) आता काही दिवसांचा अवधी राहिला असून त्याची तयारी सर्वत्र जोरात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदूषणाचे कारण पुढे करून सरकारने गणेश मूर्तीवरील उंचीवर मर्यादा आणली होती. घरगुती मूर्ती जास्तीत जास्त चार फुटापर्यंत तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती १२ फुटापर्यंत असायला हवी, असे निर्बंध घालण्यात आले होते. परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याचप्रमाणे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर सरकारने गणेश मूर्तीवरील मर्यादेची अट मागे घेतली आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या उंचच्या उंच मूर्त्या या कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात याव्यात अशी अट सरकारकडून ठेवण्यात आली आहे.

मूर्तीला हानी पोहोचणार नाही : मूर्तीवरील उंचीबाबत बोलताना मुंबईतील दादर येथील मूर्तिकार बाळाराम पाटील म्हणाले की, सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. मुंबईतील गणेशोत्सवातील ओळख ही उंचच्या उंच गणेश मूर्ती असते. परंतु एकीकडे पीओपीच्या उंचच्या उंच गणेश मूर्ती बनवत असताना दुसरीकडे शाडूच्या मातीपासून घरगुती गणपती बनवणारे मूर्तिकार मोठ्या प्रमाणात आहेत. शाडूच्या मातीपासून कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही. सरकारने गणेश मूर्तीवरील उंचीचे निर्बंध यंदा हटवल्याने साहजिकच त्याचा फायदा मूर्तिकारांना नक्कीच होणार आहे. परंतु मूर्तीकारांनी सुद्धा उंच मूर्ती बनवताना विसर्जनाच्या दृष्टिकोनातून त्या मूर्तीला हानी पोहोचणार नाही, याचे भान ठेवणेसुद्धा गरजेचे असल्याचे बाळाराम पाटील म्हणाले.

गणेश मंडळ, मूर्तिकार आनंदात : गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) मुंबईची ओळख ही अनेक मंडपात विविधरुपी विराजमान होणाऱ्या उंचच्या उंच गणेशमूर्त्या आहे. अशात सरकारने यंदा निर्बंध लावल्याने गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु निर्बंध हटवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. प्रदूषणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये शेकाप नेते, आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेमध्ये भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला. अखेर सरकारला निर्बंध हटवावे लागले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विविध रूपी ऊंचच्या ऊंच गणेश मुर्त्या गणेश भक्तांना आवर्जून बघायला भेटतील, यात काही शंका नाही.

हेही वाचा -

  1. MHADA Lottery 2023: मुंबईत घर घेण्याची संधी... म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ४,०१७ घरांच्या लॉटरीचा ऑगस्टमध्ये होणार श्रीगणेशा
  2. Vande Bharat Train For Ganeshotsav: मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेन झाली फुल्ल; कोकणवासीयांची गणेशोत्सवासाठी वंदे भारत ट्रेनला पसंती
  3. Mumbai Goa Highway Starts : कोकणवासीयांना खुशखबर, गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्ग सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.