मुंबई - सरकारने आश्वासनांची पूर्ती न केल्याने, २० ऑगस्टला पुन्हा सरकारी कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली आहे. मागच्या वर्षी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप केला होता.
काय आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
* अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.
* वेतनाच्या संदर्भातील बक्षी समितीचे दोन खंड प्रसिद्ध करावे, वेतन त्रुटींचे निवारण करावे.
* सर्व रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्यात यावीत.
* केंद्र सरकार प्रमाणे वाहतूक, शैक्षणिक आणि होस्टेल भत्ता लागू करावा.
* पाच दिवसांचा आठवडा करावा.
* महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा द्यावी.
* चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला शासनात नोकरी द्यावी.
* शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे.
* प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारिकांना १८ हजार किमान वेतन द्यावे.