ETV Bharat / state

रक्तदान शिबीर वाढवण्याचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या सूचना

कोरोनाच्या काळात रक्तदान शिबिरे व रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने राज्यात रक्ताचा राज्याततुटवडा भासत आहे. त्यामुळे राज्यात रक्तदान शिबिरे घेत रक्तसाठा वाढवण्याच्या सूचने रक्त संग्रमण परिषदेने दिल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 2, 2020, 10:42 PM IST

मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढवण्याचे मोठे आव्हान राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर उभे ठाकले आहे. त्यानुसार आता परिषदेनेही रक्तदान शिबिरे घेत रक्तसाठा वाढवण्यास मदत करावे, अशा सूचना परिषदेकडून करण्यात आली आहे.

5-7 दिवस पुरेल इतकाच साठा

राज्यात 200 हून अधिक रक्तपेढ्या असून या रक्तपेढ्यांमध्ये किमान 20 दिवस पुरेल इतका साठा असायचा. पण, आता 5 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहत आहे. याला कारण म्हणजे कोरोना. कोरोना काळात वैयक्तिक रक्तदाते कमी झाले असून रक्तदान शिबिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर रक्तदातेही भीती पोटी रक्तदानासाठी पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे रक्तसाठा कमी होताना दिसत आहे. परिणामी सध्याच्या घडीला 20 दिवसांऐवजी 5 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

गृहनिर्माण सोसायटीत वाहनाद्वारे होणार रक्त संकलन

रक्त टंचाईच्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरेसा रक्तसाठा असणे गरजेचे आहे. त्यामुळेच नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एक महत्वपूर्ण बैठक घेत रक्तदान शिबिर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तर आता राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही रक्त संकलन वाढवण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यानुसार सर्व रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरे वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर गृहनिर्माण सोसायटीमध्ये जाऊन रक्त संकलन वाहनाद्वारे रक्त संकलन करावे अशाही सूचना केल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि खबरदारी घेत ही शिबिरे घेण्याची ही सूचना परिषदेने केली आहे.

हेही वाचा - राज्यात ५ हजार ६०० नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १११ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा - वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय; सामाजिक न्याय विभागाने मांडला होता प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.