मुंबई : दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांचे नवीन प्रकार समोर येत आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पार्थ फॉइल्स कंपनीने सिल्हासा येथे प्रकल्प बांधण्यासाठी स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड करतेवेळी कंपनीची आर्थिक स्थिती अस्थिर झाली होती. याच दरम्यान कंपनीच्या प्रकल्पाला आग लागल्याने कंपनी तीन महिने बंद होती.
स्टेट बँकेची केली फसवणूक : आगीने झालेल्या नुकसानापोटी कंपनीला विम्याचे पैसे मिळाले. मात्र, कंपनी पूर्ण क्षमतेने पुन्हा उभी राहिली नाही. त्यावेळी कर्जदार बँकांनी कंपनीच्या कर्जाची पुनर्रचना करून दिली. मात्र तरीही कंपनीने कर्जाची परतफेड न केल्याने कंपनीचे खाते थकीत म्हणून घोषित केले. परंतु कंपनीने आपली फसवणूक केल्याचा संशय आल्यानंतर, स्टेट बँकेने या प्रकरणाचा सखोल शोध घेतला. त्यावेळी कंपनीने मूळ कर्ज घेण्यासाठी जी कागदपत्रे सादर केली होती. कंपनीने बँकांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीच्या आर्थिक व्यवहार अधिक फुगवून दाखवले असल्याचे निदर्शनास आले होते.
80 कोटी रुपयांचा फटका : याखेरीज कर्जाची रक्कम एका खासगी बँकेच्या माध्यमातून वळवून संचालकाने वैयक्तिक नावावर फिरवल्याचेही दिसून आले आहे. याप्रकरणी 80 कोटी रुपयांचा फटका बँकांना बसला आहे. सीबीआयकडे या प्रकरणी बँकेकडून तक्रार करण्यात आली होती. सीबीआयकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तसेच मुंबईत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 कोटींची फसवणूक : मुंबई येथे या आधीही अशीच एक घटना घडली होती. साखर निर्यात करण्याच्या नावाखाली महालक्ष्मी परिसरातील एका कंपनीच्या संचालकांनी, साखर पुरवठा करण्याचे आश्वासन देत परदेशातील एका व्यवसायिकाची 17 कोटींची फसवणूक केली होती. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -