ETV Bharat / state

मास्टर लिस्टसाठी म्हाडाची पात्रता निश्चिती व गाळे वितरण, ऑनलाईन अर्ज सुरू - मुंबई

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील भाडेकरू व रहिवाशांची पात्रता निश्चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज सुरुवात झाली.

मास्टर लिस्टसाठी म्हाडाची पात्रता निश्चिती व गाळे वितरण, ऑनलाईन अर्ज सुरू
author img

By

Published : Jun 17, 2019, 9:20 PM IST

मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील भाडेकरू व रहिवाशांची पात्रता निश्चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज सुरुवात झाली. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आज या प्रक्रियेला सुरुवात झाली. मूळ भाडेकरू व रहिवासी अथवा त्यांच्या वारसदारांना ऑनलाईन अर्जदारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

हे अर्ज भरण्यासाठी १६ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक लाभ भाडेकरू व रहिवाशांनी घेण्याचे आवाहन घोसाळकर यांनी केले. मास्टर लिस्टसाठी यापूर्वी ऑफलाईन अर्ज केले आहेत. परंतु पात्रता निश्चिती न झालेल्या भाडेकरू व रहिवाशांनी या नवीन प्रक्रियेतंर्गत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे सभापती घोसाळकर यांनी सांगितले आहे.

अर्जदारांना नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी masterlist.mhada.gov.in वर संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे माननीय सभापती विजय नाहटा, वित्त नियंत्रक विकास देसाई, सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, संगणक कक्षाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.

Intro:मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील भाडेकरू व रहिवाशांची पात्रता निश्चिती व गाळे वितरणाच्या प्रक्रियेकरिता मूळ भाडेकरू व रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांच्याकडून ऑनलाईन अर्जदारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला.
Body:१६ जुलै ला रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ अधिकाधिक भाडेकरू व रहिवाशी यांनी घेण्याचे आवाहन घोसाळकर यांनी केले. अर्ज करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत तसेच त्या निकालावर अपिलासाठी व त्या अपिलाच्या सुनावणीवर अंतिम निर्णय होईपर्यंतची मास्टर लिस्टची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व जलद होण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविली जात असल्याचे सभापतीनी सांगितले. मास्टर लिस्टसाठी यापूर्वी ऑफ लाईन अर्ज केलेल्या परंतु पात्रता निश्चिती न झालेल्या भाडेकरू व रहिवाशी यांनी या नवीन प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे सभापती घोसाळकर यांनी सांगितले.
नागरिकांना सहाय्य करण्यासाठी म्हाडा भवनातील मित्र कक्षात सेवा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे घोसाळकर यांनी याप्रसंगी सांगितले.
म्हाडाच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे माननीय सभापती विजय नाहटा, वित्त नियंत्रक विकास देसाई, सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, संगणक कक्षाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.

अर्जदारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत म्हाडा संकेतस्थळ masterlist.mhada.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपकरप्राप्त इमारतींमधील ज्या भाडेकरू/ रहिवासी यांना निष्कासन सूचना (Vacation Notice) देऊन इमारत खाली करण्यात आल्या आहेत व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणांमुळे पुनर्विकास शक्य नाही तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झाल्या आहेत परंतु कमी गाळे बांधले आहेत, अशा अनेक कारणांनी वंचित मूळ भाडेकरू व रहिवासी यांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित/पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी गाळा देण्यात आलेला नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात स्वतः अधिवास धारण करीत आहेत, अशा खऱ्याखुऱ्या मूळ भाडेकरू/ रहिवासी अथवा त्यांचे वारसदारांकरिता हा विशेष उपक्रम मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे राबविण्यात येत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.