मुंबई - राज्यात काळी बुरशी या आजाराने थैमान घातले आहे. राज्यात साधारण 2 हजारच्यावर रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये या रुग्णांची संख्या 225 असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मनपाच्या केईएम रुग्णालयात म्यूकरमायकोसिस या आजारासाठी विशेष वार्डची स्थापना करण्यात आली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड रुग्णांमध्ये या आजाराची लक्षण दिसून आली आहेत. मुंबईच्या केईएम रुग्णालयात सुमारे 60 ते 65 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. उपचारा दरम्यान रुग्णांना लागणारी औषधे दिली जातात. तसेच या विषेश वार्डमध्ये ईएनटी तज्ज्ञ, न्युरो सर्जन, नेत्र रोग तज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.
- मधूमेह आजार असणाऱ्या रुग्णांना
- स्टेरॉइडचे सेवन करणाऱ्या रुग्णांना
- आयसीयूमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना
- पोस्ट ट्रान्सप्लांट आणि मलिग्नन्सीच्या व्यक्तिना
ही आहेत म्यूकरमायकोसिसची लक्षण
- सायनसमध्ये त्रास होणे
- नाक बंद होणे
- नाकाचे हाड दुखणे
- डोळ्यांना सूज येणे
- अंग दुखणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- ताप येणे
हेही वाचा-उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेट; निलेश राणेंचा गौप्यस्फोट