ETV Bharat / state

केंद्राच्या CAA, NRC विरोधात 'भारत जोडो'ची चळवळ सुरू करा - डॉ. गणेश देवी

author img

By

Published : Jan 25, 2020, 3:04 AM IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांना चले जाव चा नारा देत देशात चळवळ उभी केली होती, त्याच मुंबईतून आता NRC आणि CAA विरोधात भारत जोडो ची चळवळ सुरू करा असे, आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी  शुक्रवारी मुंबईत केले.

mumbai
केंद्राच्या CAA, NRC विरोधात 'भारत जोडो'ची चळवळ सुरू करा - डॉ. गणेश देवी

मुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांना चले जाव चा नारा देत देशात चळवळ उभी केली होती, त्याच मुंबईतून आता NRC आणि CAA विरोधात भारत जोडो ची चळवळ सुरू करा असे, आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी शुक्रवारी मुंबईत केले. NRC आणि CAA विरोधात आग्रिपाडा येथील वायएमसीए मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा - ''भारतात बाहेरचे किती मुस्लीम आहेत, याची आकडेवारी 'त्यांनी' द्यावी''

डॉ. देवी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या चले जाव आंदोलनाची ज्या प्रकारे मुंबईत सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे आता NRC आणि CAA विरोधात देशात भारत जोडो आंदोलन केले पाहिजे. यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा. मोदी सरकार सर्वात जास्त भित्रे आहे. त्यामुळे त्यांना आता घाबरायची गरज नाही. त्यांच्याकडून NRC आणि CAA कायदे आणले तरी त्याला असहकार करा. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात संविधान ठेवा आणि आपल्या घराच्या दरवाज्यावर लिहून त्याचे स्टिकर चिकटवा "आम्ही NRC आणि CAA यासाठी सहकार्य करणार नाही. आम्ही माहिती देणार आणि कागदपत्रे दाखवणार नाही" अशी सर्वांनी भूमिका घ्या. सर्वात मोठा अधिकाराचा कागद असलेल्या भारतीय संविधानाची प्रत आपल्या घरात ठेवा, असे आवाहन डॉ. देवी यांनी केले.

हेही वाचा - 'मुंबई जिल्ह्यातील सर्व हेरीटेज इमारतींना संवर्धित करण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळा विचार केला जाईल'

यावेळी केंद्र सरकारच्या NRC आणि CAA कायद्याला विरोध करण्यासाठी महिला, पुरुषांसोबत विद्यार्थी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी डॉ. देवी यांनी मुंबईकरांना हे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी आणि सीपीआय नेते डॉ. कन्हैया कुमार, उत्तर प्रदेशातील युवा नेत्या रिचा सिंग, छात्र भारतीच्या सादिया शेख, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्या चंदा यादव, मिरान हैदर, युवा छात्र संघटनेचे सरचिटणीस मुल तालुकदार हे विद्यार्थी नेते उपस्थित होते.

Intro:मुंबईतून NRC,CAA विरोधात 'भारत जोडो'ची चळवळ सुरू करा - डॉ. गणेश देवी

mh-mum-01-nrccaa-dr-ganeshdevi-agripada-7201153

मुंबई, ता. २४:

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांना चले जावचा नारा देत देशात चळवळ उभी केली होती, त्याच मुंबईतून आता NRC,CAA विरोधात भारत जोडो ची चळवळ सुरू करा असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी आज मुंबईत केले.

NRC,CAA विरोधात आग्रिपाडा येथे असलेल्या वायएमसीए मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, केंद्र सरकारच्या NRC,CAA कायद्याला विरोध करण्यासाठी या मैदानात महिला, पुरुषांसोबत विद्यार्थी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी डॉ. देवी यांनी मुंबईकरांना हे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थी व सिपीआय नेते डॉ. कन्हैया कुमार, उत्तर प्रदेशातील युवा नेत्या रिचा सिंग, छात्र भारतीच्या सादिया शेख, जामिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्या चंदा यादव, मिरान हैदर, युवा छात्र संघटनेचे सरचिटणीस मुल तालुकदार आदी विद्यार्थी नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गणेश देवी म्हणाले की,महात्मा गांधी यांच्या चले जाव आंदोलनाची ज्या प्रकारे मुंबईत सुरुवात झाली होती, त्याच प्रमाणे आता NRC,CAA विरोधात देशात भारत जोडो आंदोलन गेले पाहिजे आणि यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. देवी यांनी केले. मोदी सरकार सर्वात जास्त भित्रे आहे. त्यामुळे त्यांना आता घाबरायची गरज नाही, त्यांच्याकडून NRC,CAA कायदे आणले तरी त्याला असहकार करा. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात संविधान ठेवा आणि आपल्या घराच्या दरवाज्यावर लिहून त्याचे स्टिकर चिकटवा "आम्ही NRC,CAA यासाठी सहकार्य करणार नाही, आम्ही माहिती देणार आणि कागदपत्रे दाखवणार नाही". अशी सर्वांनी भूमिका घ्या आणि सर्वात मोठा अधिकाराचा कागद असलेल्या भारतीय संविधानाची प्रत आपल्या घरात ठेवा, असे आवाहन डॉ. देवी यांनी केले.Body:मुंबईतून NRC,CAA विरोधात 'भारत जोडो'ची चळवळ सुरू करा - डॉ. गणेश देवीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.