ETV Bharat / state

सहकारी गेल्याचे दुःख मनात ठेवून जी. टी. रुग्णालयातील कर्मचारी लागले कामाला - सुवर्णा प्रभू

रंजना तांबे आणि अपूर्वा प्रभू या डोंबिवली परिसरात वास्तव्यास होत्या. रात्रपाळी असल्यामुळे दोघीही रुग्णालयात चालल्या होत्या. नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही होते. अनेक वर्षे या पुलावरून ये-जा करताना हा पूल आपल्यासाठी जीवघेणा ठरेल असा विचारही त्यांनी केला नसेल.

सहकारी गेल्याचे दुःख मनात ठेवून जी. टी. रुग्णालयातील कर्मचारी लागले कामाला
author img

By

Published : Mar 15, 2019, 8:44 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाला झालेल्या दुर्घटनने मुंबई हादरून गेली. या दुर्घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. मृतांपैकी सुवर्णा प्रभू, रंजना तांबे या महिला जी. टी. रुग्णालयातच कार्यरत होत्या. त्यांच्या अशा जाण्याने रुग्णालयावर शोककळा पसरली आहे. मात्र, सहकारी गेल्याचे दुःख मनात ठेवून रुग्णालयातील कर्मचारी या दुर्घटनेतील जखमींवर उपचार करून कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

रुग्णालयाच्या बाहेरून वार्ताकन करताना ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी

रंजना तांबे आणि अपूर्वा प्रभू या डोंबिवली परिसरात वास्तव्यास होत्या. रात्रपाळी असल्यामुळे दोघीही रुग्णालयात चालल्या होत्या. नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही होते. अनेक वर्षे या पुलावरून ये-जा करताना हा पूल आपल्यासाठी जीवघेणा ठरेल असा विचारही त्यांनी केला नसेल. रुग्णालय दुर्घटना स्थळापासून जवळ असल्यामुळे दुर्घटनेतील जखमींना याच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आपला सहकारी असा अचानक गेल्याने शोकाकूल वातावरणातही येथील कर्मचारी जखमींवर उपचार करताना दिसून आले.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, हे आश्वासन दुर्घटनेनंतर जनतेचा असंतोष कमी करण्यासाठी आहे, की खरंच दुर्घटनेतील मृतांच्या जीवांची किंमत लक्षात घेऊन दिलेला संवेदनशील प्रतिसाद आहे हे येणारा काळच ठरवेल. सावित्री पुल आणि इन्फिल्स्टन दुर्घटनेनंतरही अशाच पद्धतीने पुलांच्या 'स्ट्रक्चरल ऑडिटची' घोषणा झाली, मात्र त्याचे पुढे काय झाले, किती दोषींना शिक्षा मिळाली किती पीडितांना मदत मिळाली हे प्रकाशात येणे बाकी आहे.

Intro:मुंबई

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया जवळील पादचारी पुलाला झालेल्या दुर्घटनने मुंबई हादरून गेली. या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला. यातील सुवर्णा प्रभू, रंजना तांबे या परिसरातील जी टी रूग्णालयात कार्यरत होत्या. त्यांच्या असा जाण्याने रुग्णालयावर शोककळा पसरली आहे. मात्र सहकारी गेल्याचे दुःख मनात ठेवून या दुर्घटनेत जखमी झाल्यावर उपचार करून येथील कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
Body:रंजना तांबे आणि सुवर्णा प्रभू या डोबिवली परिसरात वास्तव्यास होत्या. रात्र पाळी असल्यामुळे दोघीही रुग्णालयात चालल्या होत्या. नियतीच्या मनात मात्र वेगळेच काही होते. अनेक वर्षे या पुलावरून ये जा करताना हा पूल आपल्यासाठी जीवघेणा ठरेल असा विचार ही त्यांनी केला नसेल. रुग्णालय दुर्घटना स्थळापासून जवळ असल्यामुळे येथील जखमींना या रुग्णालयात नेण्यात आले. पण आपला सहकारी असा अचानक गेल्याने शोकाकूल वातावरणात ही येथील कर्मचारी जखमींवर उपचार करताना दिसून येत होते.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. तर दोषींवर कारवाई करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.