ETV Bharat / state

MSRTC : एसटीच्या कर्मचाऱ्यांचा अद्याप पगार नाही, आंदोलनाचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १० तारीख उलटून गेली तरी देखील सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. तर पगार न मिळल्यास संघटनांनी आंदोलनाचा इशारा (protest If not paid in time) दिला आहे.

MSRTC
एसटी
author img

By

Published : Jan 10, 2023, 10:40 PM IST

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे. दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार देणे हे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलेल्या निर्देशानुसार आहे. मात्र आता दहा तारीख आली तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचे (ST Workers ) पगार होत नाही म्हणून हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे. सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करीत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल, असा इशारा (protest If not paid in time) महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. (MSRTC)

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले : वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारीखला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे. पण या महिन्यात १० तारीख आली तरी देखील वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विरोधी पक्षात असताना संपात कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलणारे भाजप नेते आता सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाची संप काळातील भूमिका व आताची भूमिका पाहिली तर भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. संप काळात संप चिघळला जावा यासाठी फुकट अन्न धान्य पुरवणारे आता कष्टाचा महिन्याचा पगार वेळेवर द्यायला तयार नाहीत. ही लबाडी असून लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. इतर सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल, असेही बरगे म्हणाले आहेत.

भाजपवर आरोप : भाजपा नेते संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडत सातवा वेतन आयोग मिळाला ही पाहिजे, विलीनीकरण झाले पाहिजे. वेतन वेळेवर मिळाले पाहिजे असे वारंवार बोलत होते. पण आता या विषयावर बोलायला तयार नाहीत. हे आता फार काळ सहन केले जाणार नाही. शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून कामगार कामगारांची पीएफ, ग्र्याज्यूटी, बँक कर्ज व इतर मिळून १२०० कोटी रुपयांची रक्कम थकली असून वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत सापडल्या आहेत, असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

मग कर्माचाऱ्यांचा पगार काही नाही : एसटी महामंडळ 90000 कामगारांचे वेळेवर दरमहा ठरलेल्या तारखेला वेतन देऊ शकत नाही हे समजण्यापलीकडचे आहे. तसेच जे एसटी महामंडळ 2000 गाड्या डिझेलच्या विकत घेण्याची तयारी दाखवते, त्याचबरोबर पाच हजार इलेक्टरीक बस घेण्याची तयारी दर्शविते. ते महामंडळातील कर्माचाऱ्यांचा पगार देऊ शकत नाही, यावर कामगारांचा विश्वास बसत नाही.

आंदोलनाचा इशारा : एसटी कामगारांनी सहा महिने तब्बल मोठा संप केला, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या केला अभुतपूर्व संप झाला. न्यायालयामध्ये खटला दाखल झाला. मात्र तरीही शासनामध्ये विलीनीकरण ही बाब तर सोडाच. मात्र पगार देखील एसटी कामगारांचे वेळेवर होत नाही. त्यामुळेच एसटी कामगारांमध्ये शासनाच्या या व्यवहाराबाबत असंतोष पसरलेला आहे. जर हा पगार वेळेत न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार कर्मचारी संघटनेने याबाबत शासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.