ETV Bharat / state

ST Fare Hike : दिवाळीच्या तोंडावर 21 ते 31 ऑक्टोबरपर्यंत एसटीची भाडेवाढ - Seasonal Hike ST Ticket Prices

राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार दिला आहे. दिवाळीच्या तोंडावर 10 टक्के इतकी भाडे वाढमुळे प्रवासी धास्तावले ( ST Ticket Increase 30 percent ) आहेत. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यन्तच भाडे वाढ ( ST Corporation ) असेल.

ST Fare Hike
एसटीची भाडेवाढ
author img

By

Published : Oct 21, 2022, 5:21 PM IST

मुंबई : एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर 10 टक्के इतकी भाडे वाढमुळे प्रवासी धास्तावले ( ST Ticket Increase 30 percent ) आहेत. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यन्तच भाडे वाढ ( ST Corporation ) असेल. मात्र शिवनेरी, अश्वमेध बससेवेला भाडेवाढीतून वगळण्यात आल्याचे राज्य एसटी महामंडळ जनसंपर्क अधिकारीकडून खुलासा करण्यात आला आहे.

10 टक्के भाडेवाढ : 10 टक्के भाडेवाढ साधी (परिवर्तन) बस, निमआराम (हिरकणी) बस, शिवशाही (आसन) बस व शयन आसनी बसेसला लागू राहील. मात्र शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. असा खुलासा जनसंपर्क अधिकरी राज्य एसटी महामंडळाकडून करण्यात आलेला ( Seasonal Hike ST Ticket Prices ) आहे. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व बसचे नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. "भाडेवाढ 1 नोव्हेबर पासून संपुष्टात येईल, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील;" असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.