मुंबई : शासनाने 300 कोटी रुपये निधीचा केवळ निर्णय केला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची वणवण काही संपत नाही. 950 कोटी रुपये ऐवजी केवळ 300 कोटी रुपये देऊन शासन बोळवण करीत आहे, असा घणाघात एसटी कर्मचारी काँग्रेस नेते श्रीरंग बरगे यांनी केला आहे. दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार देणे हे न्यायालयाने सांगितलेल्या निर्देशानुसार आहे.
कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा : आता 13 तारीख आली तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही म्हणून हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे. सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करीत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला होता.
भाजपाचा दुटप्पीपणा आला समोर : वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारीखला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे पण या महिन्यात सुद्धा 12 तारीखपर्यंत सुद्धा वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विरोधी पक्षात असताना संपात कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलणारे भाजपनेते आता सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाची संप काळातील भूमिका व आताची भूमिका पाहिली तर भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला आहे. संप काळात संप चिघळला जावा यासाठी फुकट अन्न धान्य पुरवणारे आता कष्टाचा महिन्याचा पगार वेळेवर द्यायला तयार नाहीत. ही लबाडी असून लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. इतर सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल. असेही बरगे यांनी म्हंटले होते.
अंमलबजावणी होण्यामध्ये जाणार दोन दिवस : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि महागाई भत्ता याबाबतचा शासनाने निर्णय घेतला मात्र एसटी महामंडळाचे 950 कोटी रुपये हे आधीपासूनच स्थित आहे आणि त्याच्यापैकी केवळ 300 कोटी रुपये देऊन हे शासन बोळवण करीत असल्याची भावना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. त्याचे कारण हे शासन खोटे बोलत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ करताना आणि महागाई भत्ता देताना एसटी कर्मचारी मात्र यांना आठवत नाही त्यांचा पगारही शिंदे फडणवीस शासन वेळेवर करत नाही. निर्णय जरी काल झाला तरी त्याची अंमलबजावणी होण्यामध्ये दोन दिवस जाणार. शनिवार रविवार असल्याने हे दोन दिवस जाणार त्यामुळे पगार सोमवारी होणार.
वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत : भाजपा नेते संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडत सातवा वेतन आयोग मिळाला ही पाहिजे, विलीनीकरण झाले पाहिजे. वेतन वेळेवर मिळाले पाहिजे असे वारंवार बोलत होते. पण आता या विषयावर बोलायला तयार नाहीत. हे आता फार काळ सहन केले जाणार नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून कामगारांची पीएफ, ग्र्याज्यूटी, बँक कर्ज व इतर मिळून १२०० कोटी रुपयांची रक्कम थकली असून वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत सापडल्या आहेत, असेही बरगे यांनी म्हंटले आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांची त्यावेळेला बाजू घेणारे सदाभाऊ खोत यांनी देखील याबाबत शासनाला खडे बोल आता खडे बोल सुनावले आहे.
कामगारांचा अविश्वास : एसटी महामंडळ 90,000 कामगारांचे वेळेवर दरमहा ठरलेल्या तारखेला वेतन देऊ शकत नाही, हे समजण्यापलीकडचे आहे. तसेच जेएसटी महामंडळ 2000 गाड्या डिझेलच्या विकत घेण्याची तयारी दाखवते. त्याचबरोबर पाच हजार इलेक्टरीक बस घेण्याची तयारी दर्शविते. ते महामंडळ पगार देऊ शकत नाही. यावर कामगारांचा विश्वास बसत नाही.
श्रीरंग बर्गे यांनी केली टीका : शिंदे फडणवीस सरकार एसटीच्या 90000 कर्मचाऱ्यांना गृहीत धरून चालत आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ, महागाई भत्ता वाढ, यावेळी मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत करायला पाहिजे. त्याबद्दल यांना आठवण नाही, म्हणजेच ते एसटी कर्मचारी जनतेला गृहीत धरून चालत आहेत. त्याच्यामुळेच डिस्टिक कर्मचारी आता आपले काहीच करू शकत नाही. ही भावना सत्ताधाऱ्यांमध्ये असल्याची टीका देखील श्रीरंग बर्गे यांनी केलेली आहे.
हेही वाचा : ST Employee Salary: सरकार एसटी कर्मचाऱ्यांना का छळते! महिन्याची दहा तारीख उलटली, मात्र पगार नाही
शासनामध्ये विलीनीकरण : एसटी कामगारांनी सहा महिने तब्बल मोठा संप केला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हा अभुतपूर्व संप झाला. न्यायालयामध्ये खटला दाखल झाला. मात्र तरीही शासनामध्ये विलीनीकरण ही बाब तर सोडाच, मात्र पगार देखील एसटी कामगारांचे वेळेवर होत नाही. त्यामुळेच एसटी कामगारांमध्ये शासनाच्या या व्यवहाराबाबत असंतोष पसरलेला आहे. तीनशे कोटी रुपये देऊन काय बोलवण करतात 950 कोटी रुपये जे थकीत आहे ते ताबडतोब दोन दिवसात एसटी महामंडळाला दिले पाहिजे, अशी देखील मागणी श्रीरंग बर्गे यांनी भारत सोबत बोलताना मांडले.