ETV Bharat / state

कोरोना काळात एसटीची प्रवाशांना भेट; दिवाळीत होणारी हंगामी दरवाढ यंदा रद्द! - cancelation of price increase

दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी एसटी तिकीट दरवाढ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

anil parab
कोरोना काळात प्रवाशांना दिलासा
author img

By

Published : Oct 29, 2020, 1:00 PM IST

मुंबई - दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी एसटी तिकीट दरवाढ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

प्रवासी देवो भवः..

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्क्यांपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत असतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या 'प्रवासी देवो भवः' या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मंत्री परब यांनी सांगितले.

हेही वाचा - 'अकार्यक्षम, कामचुकार अधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला लाज वाटते'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.