ETV Bharat / state

एसआरएचे 'ते' पत्रक फेक; निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - मुंबई लेटेस्ट न्यूज

एसआरए प्रकल्पात मिळालेले घर 5 वर्षात विकता येईल, असा आशय असणारे पत्रक समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. व्हायरल पत्राबाबत माहिती मिळताच एसआरएकडून निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

SRA
एसआरए
author img

By

Published : Sep 2, 2020, 9:20 PM IST

मुंबई- झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील घर 10 वर्षे विकता येत नाही, असा नियम आहे. मात्र, एसआरएचे घर ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षात विकता येईल, अशा आशयाचे एसआरएच्या नावाने असणारे एक पत्रक समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्राधिकरणाने हे पत्रक बनावट असल्याचे स्पष्ट करत याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा-राज्यातील 45 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृह विभागाचा निर्णय

एसआरएतील घर ताबा मिळाल्यापासून 10 वर्षे विकता येत नाही. 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी घर विकल्यास झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येते. 10 वर्षांची अट रद्द करत ती 5 वर्षे करण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या पत्रकात 5 वर्षात घर विकता येते, असे नमूद करण्यात आले आहे. या पत्रकामुळे नागरिकांमध्ये चुकीची माहिती जात असल्याने अनेकांची फसवणूक होऊ शकते.

एसआरएच्या नावाने बनावट पत्रक व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्या बरोबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे पत्रक बनावट असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही नमूद केले आहे. एसआरए प्रकल्पात मिळालेले घर 5 वर्षात विकता येईल, असा कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.