ETV Bharat / state

राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको

author img

By

Published : Jan 24, 2020, 10:53 AM IST

Updated : Jan 24, 2020, 4:13 PM IST

सोलापूर, कुर्ला व अमरावती येथे वंचितच्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बुलडाणा व हिंगोलीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

spontaneous-response-ar-ghatkopar-ramabai-ambedkar-band
Live: राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद कुठे दगडफेक, तर कुठे रस्ता रोको

वंचित बहुजन आघाडीच्या बंद दरम्यानच्या घडामोडी -

  • पुणे ग्रामीण भागात काही ठिकाणी बंदला सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद, तर इंदापूरमध्ये बाजारपेठा बंद
  • मुरबाड, शहापूरमधील बाजारपेठा बंद
  • अंबरनाथ शहरात बंदचा परिणाम, तर उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या वंचितच्या 30 कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
  • कल्याण-डोंबिवलीत बंदला थंड प्रतिसाद, तर काही ठिकाणी कडकडीत बंद
  • भिवंडीत धामणकर नाका येथे रास्ता रोको करणाऱ्या वंचित आघाडीच्या 70 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • बारामती शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बारामती शहरातील हॉटेल्स, मॉल, दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.
  • वंचितच्या बंदला सोलापुरात हिंसक वळण, आंदोलकांनी सिटी बस फोडली तसेच सोलापुरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला आहे.
  • बुलडाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसह 35 सामाजिक आणि राजकीय संघटनांनी शहरातून रॅली काढली, तर व्यापाऱ्यांनीही आपले उद्योग बंद ठेवले आहेत.
  • धुळ्याच्या कुसुंबा येथे वंचित बहुजन आघाडीसह अन्य डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन तर महाराष्ट्र बंदला साक्री येथे संमिश्र प्रतिसाद
  • वर्धेत वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
  • अमरावती शहरात बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरात व्यापारी प्रतिष्ठाणावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण तर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
  • अमरावतीमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक तर पोलिसांकडून लाठीचार्ज
  • हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • महाराष्ट्र बंदचा पुण्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून पुणे शहरातील वाहतूक सुरळीत आहे तर दुकानेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
  • आम्ही तगडा बंदोबस्त ठेवला आहे... नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी म्हणून आम्ही प्रयत्नशील... डीसीपी झोन 7 अखिलेश कुमार सिंह यांची माहिती..
  • रमाबाई कॉलनी जवळून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत
  • दुकाने आणि रिक्षा सेवा बंद तर वंचित आणि भारिपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
  • कुर्ल्यात बेस्ट बसवर दगडफेक, बसचालक गंभीर जखमी
  • महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर रमाबाई कॉलनीत कडकडीत बंद

मुंबई - वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने केली आहेत. काही भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर, कुर्ला व अमरावती येथे बंदला हिंसक वळण लागले असून, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बुलडाणा व हिंगोलीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर काही वेळ आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून मार्ग मोकळा केला. त्यामुळे रमाबाई आंबेडकरनगर मधील बहुतांश दुकाने बंद आहेत. तर कुर्ल्यात बेस्ट बसवर अज्ञाताने दगडफेक केल्यामुळे बस चालक गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा - पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर येथे सध्या बंद पाळला जात असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या जनजीवन सुरळीत असल्याचे चित्र दिसत असून याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

कुर्ल्यात बेस्ट बसवर दगडफेक -

बंदचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून कुर्ला स्थानकावरून चेंबूरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकावरून आंबेडकर गार्डन चेंबूर जाणाऱ्या 362 क्रमांकच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली असून बसच्या काचा फुटल्या आहेत. यात बस चालक जखमी झाला आहे. चालकाला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयांमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीत प्रवाशांना कोणतीही जखम झाली नसल्याचे बसवाहक वाहक बाबासाहेब दराडे यांनी यावेळी सांगितले. आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Intro:घाटकोपर रमाबाई आंबेडकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसादBody:घाटकोपर रमाबाई आंबेडकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडी कडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते आज सकाळीच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती मार्गावर काही वेळ येऊन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता वेळीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून हा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर मधील बहुतांश दुकाने बंद आहेत मात्र जनजीवन सुरळीत असल्याचे चित्र दिसत असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत येथीलआढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनुभव भागवत यांनीConclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.