ETV Bharat / state

Diwali Celebration : दिवाळी उत्साहात साजरी करण्याच्या नादात करु नका 'या' चुका

author img

By

Published : Oct 21, 2022, 7:53 PM IST

मुंबईमध्ये दीपावली (Diwali Celebration) हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र प्रचंड वर्दळीचा परिसर असल्याने, दरवर्षी हा सण साजरा करतांना वित्त व जिवितहानी होत असते, यंदा असे होऊ नये यासाठी नागरिकांनी योग्य दक्षता (dont make these mistakes) बाळगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून (BMC appeals to Mumbaikars) करण्यात आले आहे.

Diwali Celebration
महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : मुंबईमध्ये दीपावली (Diwali Celebration) हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटना घडतात. यासाठी दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता (dont make these mistakes) बाळगावी. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. आग लागण्यासारख्या घटना घडल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांक किंवा पालिकेच्या नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून (BMC appeals to Mumbaikars) करण्यात आले आहे.

दीपावली सणाचा आनंद द्विगुणीत करा : दरवर्षी उत्साहात दीपावली सण साजरा करतात. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद द्विगुणीत होईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

फटाके फोडताना अशी घ्या काळजी : फटाके फोडतांना सुती कपडे परिधान करावेत. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे. फटाके फोडतांना नेहमी पादत्राणे वापरावीत. फटाके लावतांना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलझडीचा वापर करावा.

फटाके फोडताना या गोष्टी टाळा : इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा थेट वापर करु नये. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या व दिवे लावू नयेत. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा पार्किंगच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत. इमारतीला रोषणाई करतांना विद्युत तारांची जोडणी घट्ट अशी करावी, सैल जोडणी करणे टाळावे, लहान मुलांचा हात लाईटींग किंवा विद्युत तारांपर्यंत पोहचेल अशी जोडणी करणे टाळावे. Diwali Celebration

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.