मुंबई : unique initiative of IIT Bombay आता जगातील कोणत्याही भाषेतील साहित्य अभ्यास भारतीय भाषांमध्ये सहज आर्टिफिशल इंटेलिजन्स मशीन टूल्स द्वारे भाषांतर करता येणार आहे. याची सुरुवात प्रत्यक्ष आयआयटी बॉम्बेने केलेली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये इंग्रजीचे हिंदी, इंग्रजीचे मराठी आणि हिंदीचे इंग्रजी मराठीचे इंग्रजी समर्पक अनुवाद करण्याची कला त्यांनी विकसित केलेली आहे. इंग्रजीची भीती किंवा आपल्या मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेची भीती स्वाभाविक आणि नैसर्गिक असते. मात्र भाषेच्या अडथळ्याला तोडण्याचे काम आयआयटी बॉम्बे आणि भारत सरकारचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत मशीन लर्निंग टूल्सद्वारे जगातल्या कोणत्याही भाषेचा कोणत्याही भाषांमध्ये आता समर्पक अनुवाद होऊ शकतो; असं तंत्रज्ञान आयआयटी बॉम्बेने विकसित केलेलं आहे. गुगलमध्ये अनुवाद होतो. परंतु त्यामध्ये सांस्कृतिक अनेक बाबींचा गाभा पकडला जात नाही. मात्र मशीन टूल्समध्ये सांस्कृतिक अंगासह अनुवाद व्यवस्थित होऊ शकतो.
उपक्रमाचा उद्देश : मातृभाषेशिवाय जगात कोणतीही भाषा ही आपल्याला जवळची नसते. हा सर्व जगमान्य सिद्धांत आहे. परंतु तरीही इतर भाषा आणि इंग्रजीशिवाय जगाचे पान हलू शकत नाही. त्यामुळे भारतातील जनतेला आणि प्रत्येक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेची अडचण भासू नये, त्यामुळे आपल्या भारतीय भाषांमध्ये अभ्यासक्रम आणि इतर कोणत्याही साहित्य मशीन लर्निंग टूल द्वारे अनुवाद करण्याचं अनोख तंत्र आयआयटी बॉम्बेनं विकसित केलेलं आहे.
दिव्यांगांना देखील होणार उपयोग : आयटी बॉम्बेच्यावतीने भाषणी या उपक्रमाच्या अंतर्गत आत्ता गेल्या दहा दिवसात इंग्रजी ते मराठी, इंग्रजी ते हिंदी, मराठी ते हिंदी, हिंदी ते मराठी अशा अनुवादाचे काम प्रत्यक्ष सुरू देखील केलेलं आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला आम्हाला आता सार्वजनिकरित्या त्या युआरएल लिंकवर जाऊन प्रत्यक्ष स्वतः त्याचा अनुभव देखील घेता येईल.
स्पीच टू स्पीच भाषांतर : स्पीच टू स्पीच अनुवाद या माध्यमातून आता डोळ्याने दिव्यांग असणाऱ्यांना सहज कोणत्याही भाषेचा कोणताही भाषेमध्ये अनुवाद करून ज्ञान घेता येईल. आता प्रत्यक्ष आवाजाने लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल समोर बोलून टायपिंग होईल आणि त्याचं समांतर पद्धतीने भारतीय भाषेत अनुवाद देखील होईल. कॉपी आणि पेस्ट करून देखील पटकन भारतीय भाषांचा योग्य अनुवाद होईल.
सुरुवातीला इंग्रजीचे मराठी, हिंदीमध्ये भाषांतर : यासंदर्भात आयआयटी बाँबे येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग टूल्सद्वारे भाषांतर करण्यात तज्ञ असलेले डॉक्टर प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे ई टीव्ही भारत सोबत संवाद साधताना म्हणाले "जगामध्ये भाषेची अडचण प्रत्येकालाच येते. मी बंगाली भाषेचा आहे मला मराठी फारशी कळत नाही. परंतु आता याच्यामुळे कळेल. ती अडचण सोडवण्यासाठी आयटी बॉम्बे आणि भारत सरकारचे विज्ञान मंत्रालय यांनी एकत्र उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून आम्ही भारतीय जनतेला त्यांच्या कोणत्याही भाषेमध्ये दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. त्याची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला आम्ही इंग्रजी ते मराठी आणि हिंदी ते मराठी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. पुढील काही दिवसातच सर्व भारतीय भाषांमध्ये हे सुरू होईल. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी यांना देखील याचा उपयोग होईल. तसेच मुके आणि बहिरे दिव्यांग असलेले विद्यार्थी त्यांना देखील आता याचा वापर करता येईल. ज्ञान घेण्याचे मार्ग त्यांना देखील उपलब्ध असतील. येत्या काळात पीडीएफ फाईलचे देखील भारतीय भाषेत समर्पक अनुवाद आता उपलब्ध होईल.
हेही वाचा :