ETV Bharat / state

दिव्यात रेल्वे ट्रॅकवर भरकटलेल्या गतीमंद तरुणीला जीवदान - gangman saved life Diva

मुंब्र्यातील घरातून वडिलांसाठी जेवण घेऊन बाहेर पडलेली तरुणी डोंबिवलीला जेवण देऊन आत्महत्येच्या विचाराने दिव्यातील जलद रेल्वे रुळावर ठाण्याच्या बाजूने चालत होती. त्यावेळी या २३ वर्षीय तरुणीला काम संपवून निघालेल्या 10 गँगमनच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले.

specially abled young girl saved
गतीमंद मुलगी जीवदान मुंबई
author img

By

Published : Feb 2, 2021, 8:36 PM IST

मुंबई - नशीब बलवत्तर असेल तर कुणाच्या ना कुणाच्या मदतीने मृत्यूच्या दाढेतूनही सुखरूप बाहेर पडता येते. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्टेशनवर नुकतीच याची प्रचिती आली. मुंब्र्यातील घरातून वडिलांसाठी जेवण घेऊन बाहेर पडलेली तरुणी डोंबिवलीला जेवण देऊन आत्महत्येच्या विचाराने दिव्यातील जलद रेल्वे रुळावर ठाण्याच्या बाजूने चालत होती. त्यावेळी या २३ वर्षीय तरुणीला काम संपवून निघालेल्या 10 गँगमनच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले.

हेही वाचा - वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू

माणूसकीचे दर्शन

वर्दळीच्या दिवा रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊननंतर आता पूर्वीसारखीच प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच रेल्वे रूळ ओलांडून चालण्याचे प्रकार घडत आहेत. रोजची सवय असलेले प्रवासी रेल्वे गाड्यांचा अंदाज घेऊन रूळ ओलांडतात. मात्र, गतीमंद तरुणी ही इकडे तिकडे न पाहताच रुळ ओलांडत असल्याचे गँगमनच्या लक्षात आले. तरुणीने थेट ट्रॅकमधूनच पायपीट सुरू केली होती. तिच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन गँगमननी तातडीने मदतीसाठी पुढे धाव घेऊन तरुणीला बाजूला नेले. भर उन्हात तिने केलेल्या पायपीटमुळे ती प्रचंड थकली होती. दिवा रेल्वे पोलिसांनी तिला माणूसकीचे दर्शन घडवत पाणी व खाण्यास दिले. त्यानंतर पोलीस मित्र आरती मुळीक-परब यांच्या मदतीने तरुणीला बोलते करून तिची ओळख पटवण्यात आली. तिचे घर शोधून तिला सुखरूपपणे तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

गँगमनचे सर्वत्र कौतुक

यासाठी भिवंडीचे गँगमन विलास पालवे, विकास गभाले, प्रशांत राजगुरू, शक्तीवेल कप्पुस्वामी, युवराज गाटवे, मनीकम सुब्रमण्यम, रामेश्वर सानी, सुनिल शेखर, बरीज किशोर यादव, मोनित नाईक या १० जणांचे, तर रेल्वे जीआरपी पोलीस हवालदार विलास परब, कॉन्स्टेबल नितीन सरवदे व पोलीस मित्र आरती मुळीक परब यांनी तीन ते चार तास घेतलेल्या विशेष मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - कोळीवाड्याच्या जमिनींसंदर्भात नाना पाटोलेंचे महत्त्वाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.